1 अवैध खैर वृक्षतोड व विना रहदारी पास वाहतूक प्रकरणी सहा आरोपी ताब्यात


पांढरकवडा: पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील रुझा बिटात अवैध खैर वृक्षतोड आणि विना रहदारी पासने मौल्यवान खैर प्रजातीच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या टोळीविरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणात अवैध खैर लाकूड आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. पांढरकवडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) विजेंद्र महेशप्रसाद दुबे यांना रुंझा बिटात अवैध वृक्षतोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह नाकेबंदी योजना आखत, रूंझा बिटा तील सखीआणि कृष्णापूर यांच्यामधील कालव्याच्या रस्त्यावर छापा टाकला. या कारवाईत एक ट्रक (MH 45/AF0945), एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर (FARMTRAC SUPER MAX-60), एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक दुचाकी (MH-29 CD 3050) जप्त करण्यात आली. या वाहनांमध्ये 178 नग खैर लाकूड (3.025 घनमीटर) आणि 3 खैर जलतान बीट आढळून आल्या, ज्यांची वाहतूक विना रहदारी पासने केली जात होती. आरोपी परशुराम आजिनाथ शिंदे (रा. पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर) अनिकेत अनिल मते(रा. घाटी,ता. घाटंजी,जि.यवतमाळ), रूपेश दौलत सोनवणे रा. सखीता.राळेगाव, जि. यवतमाळ) रूपेश शंकर बावणे (रा. घाटी, ता.घाटंजी, जि यवतमाळ) अजय शंकर कद(रा. घाटी, ता.घाटंजी, जि. यवतमाळ)सुरत सोमनाथ ढगे (रा. बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर) आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 66, तसेच महाराष्ट्र वननियमावली 2014 च्या कलम 31 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून, वन गुन्हा नोंदवून संबंधित लाकूड आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदर कारवाईत पांढरकवडा वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक श्री. धनंजय वायभासे (भारतीय वन सेवा) आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री. विक्रांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम झाले.कारवाईदरम्यान, क्षेत्र सहायक श्री. विजय चौधरी (उमरी), वनरक्षक श्री. कृष्णा सोडगीर (रूझा), श्री. सचिन येडमे (सुत्रा), श्री. आय. क्यू. मिर्झा (तिवसाळा), श्री. लक्ष्मण आडे (किन्हाळा) आणि वनमजुरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वनक्षेत्रपाल श्री. विजेंद्र महेशप्रसाद दुबे पुढील तपास करत आहेत.



Post a Comment

0 Comments