दारव्हा पोलीसांची कामगिरी
दारव्हा : बोदेगाव येथील इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी पोलीस स्टेशन दारव्हा येथील दि. ५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली जिल्हयातुन दोन आरोपीतांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन 120 रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपीतांचा दोन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला होता. यादरम्यान पोलीसांनी आरोपीतांना विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली. काही गॅस सिलेंडर हिंगोली जिल्हयातल्या कळमनुरी तालुक्यातील दिग्रस गावातील शिवारात एका शेतात ठेवले असल्याची माहीती आरोपीतांनी दिली. त्यावरुन पोलास उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, पोहेकॉ. महेंद्र भुते, पोहेकॉ. सोहेल मिर्झा यांचे पथक हिंगोली जिल्हयात रवाना केले. आरोपीतांनी सांगीतलेल्या ठीकाणी दि. 13 डिसेंबर रोजी रात्रीच शोध घेतला. एका शेतात आणखी 169 नग रिकामे इंडियण कंपनीचे गॅस सिलेंडर मिळुन आले. त्याची शहानिशा केली असता, सदरचे सिलेंडर हे बालाजी गणपत जगताप वय अं. 23 वर्षे, रा. गणपुर ता. अर्धापुर जि. नांदेड याने तेथे आणुन ठेवल्याचे समजले. बालाजी जगताप याचा त्याचे राहते घरी व आजुबाजुचे परीसरात शोध घेतला असता, मिळुन आला नाही. पोलीसांना मिळुन आलेले सिलेंडर जप्त करुन दारव्हा पोलीस स्टेशनला आणले. उर्वरीत गॅस सिलेंडर व आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, सहा, पोलीस अधिक्षक चिलुमुला रजनीकांत (दारव्हा), पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी (ठाणेदार) पोलीस स्टेशन दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, पोहेकॉ. महेंद्र भुते व पोहेकॉ. सोहेल मिर्झा यांनी केली.
0 Comments