द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे आयोजन;चेअरमन आर्किटेक्ट. सुहास पुरी यांची माहिती
यवतमाळ : "द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, यवतमाळ सेंटरद्वारा "डिझाईन वॉक यवतमाळ 2024" हा एक महत्त्वाकांक्षी इव्हेंट आहे, जो 28, 29, 30 डिसेंबर 2024 रोजी पोस्टल ग्राउंड इथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (IIA) ही भारतातील आर्किटेक्ट्सची एक प्रमुख संस्था असून, ह्याची स्थापना 1917 साली झाली
ही संस्था आर्किटेक्ट्सच्या व्यावसायिक विकासासाठी कार्यरत आहे. IIA चे उद्दिष्ट आर्किटेक्चर क्षेत्रात प्रगतिशील विचारांना चालना देणे, शहरी आणि ग्रामीण विकासाला दिशा देणे आणि आर्किटेक्ट्सचे व्यावसायिक दर्जा
उंचावणे आहे. "डिझाईन वॉक यवतमाळ 2024" या इव्हेंट मध्ये यवतमाळ शहर आर्किटेक्चर आणि इंटीरियर
डिझाइन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जाईल. हे इव्हेंट
एक अनोखे व्यासपीठ असेल, जिथे आर्किटेक्चर
आणि इंटीरियर डिझाइन क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड्स, तंत्रज्ञान, आणि इनोव्हेटिव्ह
कल्पना प्रदर्शित केल्या जातील. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध आर्किटेक्ट्स, डिझाइनर्स आणि उद्योगातील तज्ज्ञ सहभागी होतील आणि आपापले ज्ञान व अनुभवांची
देवाणघेवाण करतील. विविध प्रसिद्ध डिझाइन कंपन्या आणि उत्पादक त्यांच्या अत्याधुनिक
डिझाइन प्रॉडक्ट्स आणि तंत्रज्ञानांचे प्रदर्शन करतील. त्यामुळे स्थानिक डिझाइन इनोव्हेशनला
प्रोत्साहन मिळेल आणि या क्षेत्रातील नव्या संधी निर्माण होतील. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व
"द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स,
यवतमाळ सेंटरचे चेअरमन,.
सुहास पुरी, आर. राहुल सांगळे
(वाईस चेअरमन), आर. आनंद जैन (सचिव), आणि आर. स्वप्निल खडके (खजिनदार) यांसह आर. अमर केळकर, आर. आशिष दुद्दलवार, आर. स्वप्नील लाखनी, आर. विद्या
तम्मेवार आणि यवतमाळ शहरातील ५१ आर्किटेक्ट याची उपस्थिती होती. यवतमाळ शहराच्या शहरी
विकासाला, सामाजिक जागरूकतेला, आणि उद्योगासाठी नवीन दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी हा इव्हेंट एक सुवर्णसंधी
असेल. यामध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती या उपक्रमातून प्रेरणा घेत आपापल्या
क्षेत्रातील कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतील असे आज शिवालय रिसॉर्ट अँड डेस्टिनेशन
येथे झालेल्या पत्रकार परिषद येथे आर्किटेक्ट. सुहास पुरी, चेअरमन यांनी सांगितले.
0 Comments