इंडिया आलायन्सच्या खासदारांचे संसद भवन परिसरात निदर्शने

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध


दिल्ली : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी  राज्यसभेत संविधानावर होत असलेल्या चर्चे दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेषपूर्ण व अकसपूर्ण वक्तव्य केले. त्याबद्दल आज काँग्रेसचे राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आलायन्सच्या खासदारांनी नई दिल्ली येथे संसद भवनाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर निषेध निदर्शने केली. तसेच प्रतिमेपासून ते संसद भावनाच्या मकर द्वार पर्यंत मार्च करुन मोदी सरकारचा व अमित शाह यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा घोषणा दिल्या.


Post a Comment

0 Comments