तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
मंचक गोरे : महागाव
भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या संविधान प्रकृतीची परभणी येथे दि. 10 डिसेंबर 2024 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीची तोडफोड झाल्याची घटना घडली. यामुळे परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रात मधून संविधान प्रेमी व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला . महागांव मध्ये तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संविधान प्रकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.देशामध्ये यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून सदर बाबीला आळा घालण्यासाठी आरोपीवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सर्व संविधान प्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग रस्त्यावर उतरेल. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना दीपक तायवाडे, सिद्धांत डोंगरे, शाम तायवाडे, रतिश सांगडे, बाबू पांडे, गोलू कावळे, मिलिंद मुनेश्वर, आदर्श सावळे, अनिल पांडे सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
0 Comments