जेसीबिने ट्रकच्या कॅबिनमधुन चालकाला काढले
यवतमाळ : विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या
पैनगंगेच्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळला. ही घटना विदर्भ
मराठवाडा जोडण्यात गेलेल्या धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगा नदीवरील
पुलावर आज शनिवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात चालक संतोष यादव राठोड वय २४ वर्षे
रा भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा गंभीर जखमी झाल्याने त्यास माहूरच्या ग्रामीण
रुग्णालयात आणले असता वैद्यकिय अधिकारी अक्षय वाठोरे यांनी प्रथम उपचार करून त्यास
पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले. चालक हा अपघातग्रस्त ट्रकच्या केबीनमध्ये दबला
होता. माहूर येथील दत्त शिखर व साडेतीन पिठा पैकी एक
शक्तीपीठ असलेले माता रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य भाविक
या पुलावरून ये- जा करत असतात. या पुलावर नेहमीच गर्दी होत असते. पैनगंगा नदीवरील या
पुलाला मागील अनेक महिन्यांपासून संरक्षक कठडे नाहीत. या ठिकाणी नेहमीच अपघात घडतात.
आज शनिवारी सायंकाळी ५ वाजातच्या सुमारास सिमेंटने भरून एमएच ३४
एबी ४०२३ क्रमांकाचा ट्रक पुलावरुन
पैनगंगा नदी पात्रात कोसाळला. या अपघातात चालक हा ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकला होता.
यावेळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने चालकाला ट्रकच्या
केबिन मधून काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर चालकाला
ट्रकमधून बाजेर काढले असून, तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले
आहे. यावेळी काही वेळ पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी तात्काळ
महागाव पोलीस स्टेशन व माहूर पोलीस स्टेशनचे
पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे.
0 Comments