संविधान ग्रंथाचा अवमान: समाजाला हादरवणारी घटना

प्रा. प्रवीण देशमुख यांनी केला तीव्र निषेध




यवतमाळ : परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधान ग्रंथाचा अवमान होणे, ही घटना समाजाच्या चित्तवृत्तीला हादरवणारी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा. प्रवीण देशमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संविधानाचे अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची आठवण करून देत त्यांनी सांगितले की,सूर्यवंशी हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि वडार समाजातील एक उभरता नेता म्हणून सूर्यवंशी समाजासाठी योगदान देत होते. परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते.संविधानाच्या लढ्यात त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होणे हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे,तर संपूर्ण समाजासाठी दुर्दैवी आहे.

बीड जिल्ह्यातील एका युवा सरपंचाच्या दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येचा संदर्भ देत प्रा.देशमुख म्हणाले की,अशा घटनांमधील मास्टरमाईंड आजही मोकाट असल्याची वस्तुस्थिती धक्कादायक आहे.केवळ राजकीय लागेबांधे किंवा वरदहस्ताच्या आधारे गुन्हेगारांना अभय देणे समाजाच्या न्यायप्रेमी वृत्तीला धरून नाही.प्रवक्ते प्रा.देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments