रेती तस्करांकडुन तलाठ्यावर हल्ला : लोखंडी रॉडने केली मारहाण

वाढोणा बाजार येथील घटना : वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा



यवतमाळ : जिल्ह्यात नदी पात्रासह रेती घाटावरून बेसुमार रेतीचा उपसा करुन अवैषपणे वाहतुक होत असल्याचे सर्वश्रुत आहे. महसुल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येते. रेतीच्या गाड्या चालवु का देत नाही म्हणून वाद करुन तलाठ्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. या हल्ल्यात तलाठी जखमी झाला. ही घटना वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या वाढोणा बाजारा येथे घडली.

मिलींद नामदेव लोहत रा. वर्धा असे जखमी तलाठ्याचे नाव असून, ते तीन महिन्यापासून वाढोणा बाजार येथे कार्यरत आहे. प्रतिक वाढोणकर असे हल्ला करणा-यांचे नाव आहे.  १२ डिसेंबर रोजी वाढोणकर याने तलाठी कार्यालयात रेतीच्या गाड्या का चालु देत नाही म्हणुन वाद घालुन मला शिवीगाळ केली. यावेळी तलाठी लोहत यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीस विरोध केला होता. अशातच तहसिलदार राळेगाव यांनी मागिल काही दिवसापुर्वी मिटींग घेवून मीटींग मध्ये अँग्रीटेक सर्वेचा कँम्प घेण्याकरीता 3 दिवस कॅम्पमधे हजर राहण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे तलाठी लोहत हे 17 डिसेंबर पासुन वाढोणा बाजार येथील तलाठी कार्यालयात रात्री आराम करीत होते.  अशातच प्रतिक वाढोघकर व त्याचे दोन साथीदारांनी तलाठी कार्यालय गाठून तु असा कसा आमच्या रेतीच्या गाड्या चालु देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. त्यानंतर साथिदाराला पकडायला लावुन प्रतिक वाढोणकर याने पाठीमागुन लोखंडी रॉडने डोक्यावर मारला. यावेळी तलाठ्याने आरडा ओरड केली. तलाठी कार्यालया शेजारी असलेले लोक उठल्याने प्रतिक वाढोणकर व त्याचे दोन साथीदार हे तेथुन पळुन गेले.यावेळी जखमी तलाठ्याला गावातील लोकांनी उपचाराकरीता दवाखाण्यात नेले. दि. 17 डिसेंबर रोजी रात्री 10/30 वा. दरम्यान तलाठी कार्यालय वाढोणा बाजार येथे शासकीय कामकाज करीत असताना प्रतिक वाढोणकर व त्याचे दोन साथीदार यांनी लोखंडी रौडने डोक्यावर, हातावर व पायावर मारहाण केली. अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार तलाठ्यांनी वडकी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन वडकी पोलिसांनी प्रतिक वाढोणकर व त्याच्या दोन साथीदारावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

 

Post a Comment

0 Comments