चोरीच्या कपड्याचे दुकान लावण्या पुर्वीच दोघांच्या हातात हातकडी

चार कपड्याचे दुकान फोडले : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त


यवतमाळ : अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेताजी मार्केट व माईंदे चौकातील चार दुकाने फोडून चोरी केलेल्या कपड्याचे दुकान सुरु करण्याचा प्लॅन चोरट्यांनी आखला होता. मात्र अवधूतवाडी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करुन त्यांच्या हातात हातकडी टाकुन पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तेजस बळिराम चव्हाण वय ३३ वर्षे रा घांटुंबा पो शिवणी ता घांटजी, प्रमोद साहेबराव चव्हाण वय २४ वर्षे रा घोटी ता घाटंजी अशी आरोपींची नावे आहे. गेल्या काही दिवसापूर्वी शहरातील नेताजी चौक व माईंदे चौकातील चार कापडाचे दुकान फोडून लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. दरम्यान आज अवधूतवाडी डि बी पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली. यावेळी आरोपींनी चार कापड दुकान फोडल्याची कबुली दिली. आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल, चोरी करण्यासाठी कुलुप कट करता यावे म्हणुन वापरलेले एक बॅटरीवर चालनारे कटर/ग्रॅडर दोन चार्जीग बॅटरी सह कापड दुकानात चोरी केलेला शर्ट पॅन्ट असा एकुण ,००,००० किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, सफौ गजानन वाटमोडे, सफौ मेश्राम, पोहवा विशाल भगत, पोहवा बलराम शुक्ला, पोहवा रवि खांदवे, पोना रूपेश ढोबळे, पोशी मोहम्मद भगतवाले, पोशी रशीद शेख, पोशी योगेश चोपडे यांनी केली.

Post a Comment

0 Comments