अन पराटीवर फिरवला नागर; कापुसही पेटविला

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : सरकारच्या निषेधार्थ आंदोलन




यवतमाळ:  नवनिर्वाचित महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले आहे कालच मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी नागपूर मध्ये मोठ्या थाटात शपथविधीचा कार्यक्रम ठेवला. आज 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली आहे. विदर्भात नेहमीच हिवाळी अधिवेशन घेतल्या जाते. विदर्भाच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसून येथील महाराष्ट्राचे सर्व मंत्री आठ  दिवस विदर्भाच्या पैशावर मौज मारतात. पण विदर्भाचा कुठलाही प्रश्न सोडवल्या जात नाही. यवतमाळ मध्ये शेतकरी आत्महत्या दिवसात दिवस वाढत आहे. त्यासाठी कुठलीही यंत्रणा सरकार राबत नाही आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडकडून बोधगव्हाण येथे शेतकऱ्याच्या कापसाला तुरीला आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे कापसाची होडी करून उभ्या पराटीवर नांगर फिरवून निषेध करण्यात आला.


कापसाला आणि सोयाबीनला या सरकारने योग्य दर दिला नाही तर उद्या हाच नांगर त्यांच्या बंगल्यावर सुद्धा फिरू असे संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी खडसावून सांगितले आहे. यावेळी गावातील इतर शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मयूर मिसाळ, सुरज पाटील ,अनिकेत मेश्राम ,गजानन चेकें, माझी सरपंच गजानन आत्राम, नितेश महापुरे, रामा मोहोदे, संदीप मेश्राम, अण्णा, नारायण कुरसंगे इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments