तलाठ्याला मारहाण करणा-या आरोपींना अटक


यवतमाळ : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढोणा बाजार येथील तलाठ्यावर प्राणघातक हल्ला चढविला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना अमरावती जिल्यातील अचलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी येथून अटक करण्यात आले. वडकी पोलिसांनी आज ही कारवाई केली.
प्रतीक दशरथ वाढोणकर, वय 34 वर्ष, रा. वाढोणा बाजार, सतीश बाबाराव मडावी,(शेबड्या) वय 25 वर्ष, दादा बादशहा नगर राळेगाव, प्रमोद मोतीबाबा सोनुले, वय 25र्ष रा. वरध ता. राळेगाव अशी आरोपींची नावे आहे. १७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वाढोणा बाजार येथील तलाठी लोकसेवक मिलिंद नामदेवराव लोहात याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पो.स्टे.वडकी गुन्हा रजि. नं.669/2024 कलम 132,121(2), 333, 296, 351(2), 3(5)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी प्रतीक वाढोणकर, सतीश मडावी, प्रमोद सोनुले हे स्विफ्ट कार क्र. MH 32, Y 4420 ने पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, कारंजा लाड, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव असा पोलिसांना चकमा देत होते. अशातच सदर आरोपीतांना अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अचलपूर हद्दीतील सिंधी येथे आरोपीतांच्या मुस्क्या आवळण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील कारवाई वडकी पोलीस करीत आहे. सदर आरोपीतांचे शोध घेणे कामी सायबर टीमने मदत केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंजनेयांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधवख, पोलीस शिपायी किरण दासरवार, आकाश कुदुसे, विनोद नागरगोजे, दीपक वॉड्रसवार, सचिन नेवारे यांनी केली.

Post a Comment

0 Comments