नववर्षाच्या पुर्वसंध्येला पोलीस दलात खांदेपालट
यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र सरत्यावर्षाला निरोप व
नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतांनाच अचानक जिल्हा पोलीस दलात खांदेपालट
करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी बदलीचे आदेश पारित केले आहे.
एलसीबीच्या (स्शानिक गुन्हे शाखा) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांची
नियुक्ती करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतून
पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्याकडे ट्रॉफीकची (जिल्हा वाहतुक शाखा)
धुरा देण्यात आली. तर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांची
शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. पिआय देवकते यांनी यापुर्वीही ट्रॉफिकची
धुरा सांभाळली आहे.आज सायंकाळी सतीश चवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेची
सुत्रे हाती घेतली.
0 Comments