जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थाला दुस-यांदा बँको पुरस्कार जाहीर

यवतमाळ : महाराष्ट्रातील दुस-या कमांकाची व सातत्याने ऑडीट वर्ग 'अ' श्रेणी जोपासणारी यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था म. यवतमाळ र.नं.१०९ या संस्थेला बँको पब्लीकेशन कोल्हापुर तथा गॅलेक्सी इन्मा संस्था पुणे यांच्या वतीने आयोजीत राज्यस्तीय उत्कृष्ठ काम करणा-या पतसंस्थे संदभर्भातील बैंको क्न्यु रिवन स्पर्धेचे सलग दुस-यांदा विजेतेपद घोषित झाले. या बाबतची माहीती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, उपाध्यक्ष संजय गावंडे व सचिव संजय विहाडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र स्तरावर प्रामाणिक व चोख काम करणा-या तसेच कायदे व नियम यांचे काटेकोर पालन करीत तिनशे कोटीच्या वर ठेवी वाढवणा-या पतसंस्थेचा हुरूप वाढवण्याकरीता दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रात दुस-या कमांकावर असणा-या या संस्थेत ३२६ कोटी रूपयाच्या ठेवी असुन ३९ कोटी भागवांडवल आहे संस्थेचे २६६ कोटी रूपयाचे कर्जवाटप असुन गुंतवणुक १४६ कोटी रूपयाची आहे. कर्मचारी पतसंस्था असल्याने कर्ज वसुलीचा वाढता टप्पा, ज्या दिवशी अर्ज त्याच दिवशी कर्ज, सभासदांना ९८० रूपयात तिस लाखापर्यतचे अपघाती विमा संरक्षण, संस्थेच्या सभासदांसाठी सहा लाख ते बारा लाख पर्यंतची कुंटुब आधार योजना, ठेवीदारांना देय असणारा आकर्षित व्याजदर, यवतमाळ मुख्य कार्यालयासह पुसद, वणी, दारव्हा, आर्णी व पांढरकवडा येथील अत्याधुनिक सॉफ्टवेअरने काम करणा-या संपुर्ण संगणकीकृत शाखा, यवतमाळ येथे मध्यवस्तीत विवीध कार्यकमाच्या आयोजनासाठी सुसज्ज असलेले सहकार सांस्कृतिक भवन तसेच यवतमाळ येथील मुख्य कार्यालयात अल्प दरात उपलब्ध असलेली लॉकर सुविधा अशा अनेक गुणवैशिष्टयाने प्रगतीकडे वाटचाल करणारी व सभासदांचा तसेच ठेवीदारांचा संस्थेवर असणारा विश्वास या अनेक गुणांकनाच्या पार्श्वभुमीवर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये याही वर्षी संस्थेला प्रथम कंमाक मिळाला आहे. जानेवारी २०२५ मध्ये आयोजीत बँको सहकार परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांचे नेतृत्वात उपाध्यक्ष संजय गावंडे, सचिव संजय विहाडे, संचालक सुभाष धवसे, पोपेश्वर भोयर, शरद घारोड, मुकेश भोयर, अशोक चटप, प्रदिप मोहटे, विनोदकुमार कदम, गजानन पोयाम, तुषार आत्राम, स्वप्नील फुलमाळी, नदिम पटेल, अभिजीत ठाकरे, विलास टोंगे, सचिन ठाकरे, तेजस तिवारी, सुनिता गुधाणे व विजया राऊत आदिंच्या उपस्थितीत स्विकारल्या जाणार आहे.

Post a Comment

0 Comments