चोरट्यास अटक : १९ दुचाकी जप्त
यवतमाळ : विदर्भ व तेलंगणा राज्यात दुचाकी
चोरट्याने नेटवर्क उभे केले आहे. विदर्भासह तेलंगणातील दुचाकी चोरून नेण्याचा
सपाटा चोरट्यांनी लावला होता. अशातच पिंपळखुटी परिसरात पेट्रोलिंगवर असलेल्या स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने पथकाने चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून १९ दुचाकीसह
लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेहमतुल्ला मुजिब चाऊस रा. आदिलाबाद राज्य तेलंगणा असे चोरट्याचे नाव आहे. स्थानिक
गुन्हे शाखेच्या अधिनस्त पथक २९ डिसेंबर रोजी पिंपळखुटी परिसरात पेट्रोलिंग करीत
होते. अशातच तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील युवकाला टि.एस. १८ ई १८२४ क्रमांकाची
मोटर सायकलने घेवून जाता होता. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याची कसुन चौकशी केली
असता सदर दुचाकी मुकुटबन येथे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच विदर्भातील यवतमाळ,
चंद्रपूर, तेलंगणातील अदिलाबाद, निर्मल या परिसरातून १९ दुचाकी किंमत ८ लाख ४०
हजार रुपयाचा
मुद्देमाल जप्त करण्यात आल्या. अन्य वाहनाचा शोध घेणे सुरु आहे. सदर
कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंतापियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांचे नेतृत्वात स्थानिक
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीच्क अजयकुमार वाढवे,
पोलीस हवालदार उल्हास
कुरकुटे, सुनिल खंडागळे,
सुधिर
पांडे, पोना सुधिर पिदुरकर,
पोलीस शिपायी रजनिकांत मडावी व चालक पोलीस हवालदार नरेश राऊत यांनी केली.
0 Comments