संविधाना वरील हल्ले थांबविण्यासाठी संविधान जनजागृती अभियान राबविणार

भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांची माहिती

यवतमाळ : या देशात मोदी सरकार आल्या पासून भाजप आरएसएस मनवादी लोक  संविधानावर हल्ले करत असून ते हल्ले रोखण्यासाठी मनुस्मृती दिनानिमित्त आजपासून संबंध महाराष्ट्रभर संविधान जनजागृती अभियान राबविणार असल्याचे प्रतिपादन यांनी आज  विश्रामगृह यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे.
पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले की पूर्वी मनुवादी भाजप आरएसएसचे लोक संविधानाला बदनाम करण्याचे काम करत होते.पण आज दुर्दैवाने ज्या संविधानाचा आधार घेऊन संविधानिक पदावर बसलेले लोक सुद्धा सुविधाला टार्गेट करत आहेत संविधान विरोधक म्हणतात आम्हाला 400 जागा द्या, आम्ही संविधान बदलू परभणी येथील संविधान प्रति कृतीवर केलेला हल्ला असेल, 2024 नंतर या देशात निवडणुका होणार नाहीत, नवीन संसदेमध्ये संविधानाचे वाटण करताना संविधानातील प्रास्ताविक मधील धर्मनिरपेक्ष शब्द गाळला असेल असे शेकडो उदाहरण देता येतील.आज संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले असून या 75 वर्षात 29 राज्ये 8 केंद्रशासित प्रदेश 7500 जाती शेकडो प्रथा परंपरा भाषा यांना सुरक्षित ठेवण्याचे काम आपले भारतीय संविधान करत आहेत. पण दुर्दैवाने आज सरकारमध्ये बसलेले लोकच इथल्या बहुजन समाजाला गुलाम करण्यासाठी इथली लोकशाही उध्वस्त करण्यासाठी इथल्या सेक्युलर पणाला तडे देण्यासाठी या देशातील संविधान बदलण्यासाठी धडपड करीत आहेत जनतेमध्ये संविधाना विषयी चुकीची माहिती देत आहेत. हे सर्व करण्या पाठीमागील त्यांचा उद्देश या देशात मनुस्मृती लागू करून या देशाला हिंदू राष्ट्र करणे होय आजही या देशात प्रत्येक जाती धर्मातील व्यक्ती सुरक्षित आहेत त्याचा धर्म सुरक्षित आहे त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित आहेत त्याला कारण आपले भारतीय संविधान आहे तेच संविधान जर बदलले तर इथला बहुजन समाज,एससी,एसटी ओबीसी समाज उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सर्व थांबण्यासाठी संविधानाचे महत्व बहुजन समाजामध्ये सांगण्यासाठी मनुस्मृती दिना निमित्त संविधान जनजागृती अभियान असल्याचे  दादासाहेब शेळके पत्रकार परिषदेत म्हणाले.

 या पत्रकार परिषदेला विदर्भ अध्यक्ष विनोद फुलमाळी विदर्भ कार्याध्यक्ष टोनुभाऊ मेश्राम जिल्हाध्यक्ष रावण शेंडे जिल्हा, संपर्कप्रमुख समेध पेटकर,विजय धुळे युवा जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख करण भरणे उपजिल्हाप्रमुख अक्षय उके, युवा तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments