वीज पडून महिलेचा मृत्यू

मारेगाव तालुक्यातील केगांव (गोधणी) येथील घटना

यवतमाळ : विदर्भ व मराठवाडय़ातील जिल्ह्यात दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी गारपीट व मेघगर्जनेसह पाऊस येणार असल्या अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला होता. मारेगाव तालुक्यातील केगांव गोदणी येथील महिला शेतामधून घरी परत येत  होती. अशातच विज पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील केगाव (गोधणी) येथे  दि. 27 डिसेंबर 2024 रोजी शुक्रवारला सायंकाळी 5-30 वाजताच्या दरम्यान घडली.

मेघा गणपत पानघाटे वय 43 वर्ष रा. केगाव असे मृतकाचे नाव आहे. केगाव येथील गणपत पानघाटे यांचे कडे 4 एकर शेती आहे. काही  शेती त्यांनी मकत्याने गोधनी शिवारात केलेली होती. त्यांची पत्नी शेतामध्ये कापूस वेचण्याकरिता एका महिले सह गोधनी शेत शिवारात गेली होती. शेतामधून घरी परतत असताना रस्त्यात असलेल्या डाखरे यांच्या शेताजवळ आली. अशातच  अंगावर वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात  भरती केले. मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments