गुंज : येथील शेतकरी पुत्राने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निरंजन रामराव राठोड वय 22 असे मृतकाचे नाव आहे. गुंज येथील स नं 370 क्षेत्र 0 हे 58 आर शेती आहे. शेतीच्या सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे. वसंता राठोड यांच्या जबानी रिपोर्ट वरून ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रामराव आडे, कैलास मुकाडे यांनी पंचनामा केला. मृतदेह सवना येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
The Menu of this blog is loading..........
0 Comments