एमपीजे संघटनेची मागणी : मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
उमरखेड :- मुव्हमेन्ट फॉर पिस ॲन्ड जस्टीस फॉर वेलफेयर या संघटने तर्फे 10 डिसेंबर रोजी परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीला क्षतिग्रस्त करने, त्यानंतरच्या हिंसक घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुःखद मृत्यू च्या संबंधाने मा मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले .
परभणी प्रकरणाचा उच्चस्तरीय, निःपक्षपाती आणि स्वतंत्र तपास करणे , पारदर्शकता आणि उत्तरदायित्व - तपास प्रकिया पूर्णपणे पारदर्शक असावी या प्रकरणी सरकार ने न्याय मिळवून द्यावा, शांतता आणि सौहार्द प्रस्थापित आणि एकोपा पूर्ववतकरण्यासाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलावीत .सर्व संबंधितांनी पक्षांशी संवाद सुरू करावा जेणेकरून विश्वासाचे वातावरण निर्माण होईल आणि या संवेदनशिल समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढता येईल , संविधानाची सुरक्षा -संविधानाच्या प्रतिकृतीला हानी पोहोचणाऱ्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी .या घटनेमागील परिस्थिती आणि जबाबदार व्यक्तीचा शोध घ्यावा जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल . अश्या आशयाच्या मागणीचे निवेदन मा मुख्यमंत्री यांना देण्यात आले .निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष फेरोज अन्सारी , सुनिल चिंचोलकर , उत्तम बरवड , देवानंद मोरे , रेखाताई गायकवाड, स्वरांजली वाघमारे ,रसुल पटेल , प्रा गजानन दामोदर , मोहसीन राज , सैय्यद रजा , डॉ फारुक अबरार , समीर अहेमद , सिध्देश्वर दिवेकर , संजय मोरे , राहुल सुर्य . साहेबराव कदम , वैशाली कवडे , मिनाज अहेमद , तस्लीम अहेमद , अन्सार हुसैनी ,मोनिका भगत आदी उपस्थित होते.
0 Comments