आरोपीने केली पोलीस शिपायाची हत्या : मारेक-यास जन्मठेप

पांढरकवडा अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल


यवतमाळ : पोलीस कर्मचारी एका आरोपीच्या घरी गैरजमानती वॉरंट बजावण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने दांड्याने पोलीस शिपायावर हल्ला करुन हत्या केली. तर अन्य पोलीस कर्म-यांवर प्राणघातक हल्ला केला होता. २०१८ मध्ये ही घटना घडली असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान आज
पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए. एम. देशमुख यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. आरोपीला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

अनिल लेतु मेश्राम, वय ४१ वर्षे रा. हिवरी, ता. मारेगाव असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. २६.११.२०१८ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतु मेश्राम यांचेवर गैरजमानती वॉरंटची बजावणी करण्याकरीता पोलीस शिपायी राजेंद्र बाजीराव कुडमेथे, पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके,, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद खुपरे असे शासकिय वाहनाने आरोपीचे गावी हिवरी येथे गेले होते. यावेळी आरोपीने वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण केला. लाकडी दांडयाने राजेंद्र कुडमेथे याच्या डोक्यावर वार करुन हत्या केली. ईतर पोलिस कर्मचा-यावर लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्याना जख्मी केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पोलिस कर्मचा-याची साक्ष व शवविच्छेदन अहवालावरुन फिर्यादी मधुकर मुके याने पो.स्टे. मारेगाव येथे घटनेचा रिपोर्ट दिला. त्यावरून पो.स्टे. मारेगाव येथे अपराध कमांक ३९९/२०१८ मध्ये कलम ३०२, ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यानी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. समक्ष पोलीस स्टेशन मारेगाव, येथील अप.क. ३९९/२०१८ कलम ३०२, ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४ भा.दं.वि.अंतर्गत फौजदारी प्रकरण सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये आज रोजी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाला. आरोपी अनिल लेतु मेश्राम, वय ४१ वर्षे रा. हिवरी, ता. मारेगाव याला ३०२ भा.दं.वि. मध्ये मनुष्य वध प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व १०,००० रुपये दंड ठोठावला.  दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास, तसेच भादवी चे कलम ३०७ मध्ये १० वर्षे सश्रम कारावास ३००० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास, भादवीचे कलम ३५३ अंतर्गत १ वर्षे शिक्षा व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधा कारावास, भादवीये कलम ३३३ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने कारावास, भादवीचे कलम ३३२ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षाची शिक्षा. व ३२४ भादवी अंतर्गत २ वर्षे कारावास व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा आज दि. २१/१२/२०२४ रोजी ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकत्र भोगायचे असा आदेश पारीत करण्यात आला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने ९ साक्षदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश डी मोरे यांचा युक्तिवाद केला. या प्रकरणाचा तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणुन ए.एस.आय दिपक गावंडे यांनी काम पाहिले.

 

Post a Comment

0 Comments