५० गॅस सिलेंडरसह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील गॅस सिलेंडरच्या गोडाउनमधुन ५२५ गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पुन्हा ट्रक चालकाला अटक केली असून, त्याच्याकडून ५० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व दारव्हा पोलिसांनी ही कारवाई केली. उर्वरीत फरार असलेल्या आरोपींची शोधमोहिम सुरु आहे.मोहसीन कुरेशी अब्दुल वाहेद कुरेशी वय 35 वर्षे, व्यवसाय चालक, रा. अर्धापुर जि. नांदेड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दारव्हा
पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या बोदेगाव येथील गुरु माउली ग्रामिण वितरक इंडियन
गॅस एजन्सीच्या गॅस सिलेंडर गोडाएन मधून दिनांक 4 डिसेंबर ते ते 5 डिसेंबर 2024 रोजी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी
रिकामे व भरलेली असे एकुण 525 गॅस सिलेंन्डर
किमंत 13,13,784/- रु. गॅस
सिलेंन्डर चोरुन नेले होते. ५ डिसेंबर रोजी अमोल प्रकाश ठाकरे रा. बोदोगाव
यांनी दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन दारव्हा
पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व
दारव्हा पोलिसांनी तपासचक्रे फिरविले. संशईत वाहनाचा क्रमांक MH-26-AD- 0697 असा प्राप्त करुन सदर वाहन मालकी बाबत
माहीती घेवुन तांत्रीक बाबी पडताळल्या. यामध्ये घटनेचे दिवशी संशईत
ट्रकचा चालक मोहसीन कुरेशी अब्दुल वाहेद कुरेशी वय 35 वर्षे, रा. अर्धापुर जि.
नांदेड हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन वरुन स्थानिक गुन्हे शाखा व दारव्हा पोलीस पथकांनी अर्धापुर
जि. नांदेड गाठुन चालक मोहसीन कुरेशी यांचा शोध घेतला. त्यानंतर डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली
येथे 12 टायर मालवाहू ट्रकसह
ताब्यात
घेतले. पोलिसांनी सखोल विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हाची कबुली
देवुन त्याने त्याचे सोबतील साथीदारांचे नावे उघडकीस केली. आज पर्यंत. तपासात आरोपी मोहसीन कुरेशी अब्दुल वाहेद कुरेशी वय 35 वर्षे, व्यवसाय- चालक, रा. अर्धापुर जि. नांदेड, दत्ता तुकारम करपे वय 37 वर्षे रा. डिग्रस बु. ता. कळमनुरी जि. हिंगोली, सैय्यद शिकील सैय्यद युसुफ वय 40 वर्षे
रा. अर्धापुर जि. नांदेड यांना निष्पन्न केले. दिनांक 20 डिसेंबर रोजी 50 गैस सिलेंडर जप्त करण्यात आले. आज पर्यंत एकुण 339 गैस सिलेंडर व 12 टायर मालवाहू
ट्रक असा एकुण 32,45,800/- रु. चा
मुद्देमाल जिल्हा नांदेड व हिंगोली येथुन जप्त करण्यात आला. गुन्ह्याती ईतर पसार आरोपी
व उर्वरीत चोरीचा मुद्देमाल याचा पोलीस पथका कडुन कसोशीने शोध घेवुन पुढील तपास सुरु
आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा चिलूमुला रजनिकांत, यांचे मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक
ज्ञानोबा देवकते, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पो. स्टे. दारव्हा, स.पो.नि. विजय महाले स्था.गु.शा.,
पो.उप.नि. शिवशंकर कायंदे पो.स्टे. दारव्हा, पोलीस अंमलदार बबलु चव्हाण,
सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेद्र चौधरी, महेद्र भुते, अमोल सारोख, युवराज चव्हाण यांनी केली.
0 Comments