आता खड्ड्यांचाही ‘हॅपीबड्डे’

संभाजी बिग्रेडचे हटके आंदोलन

राहुल वासनिक / यवतमाळ : शहरासह ग्रामिण भागातील नागरिकांना भौतिक सुविधा उपलब्द करुन देण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाची आहे. नगर पालिका व बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात लाखो रुपये खर्च करुन रस्ते तयार करण्यात आले. मात्र रस्ते केल्यानंतर काही महिने, वर्षभरातच रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यवतमाळ शहरातील मेन लाईन परिसरातील रस्त्यावर एक वर्षापासून खड्डे पडले आहे. सदर खड्डे बुजविण्यात यावे किंवा रस्ता तयार करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सबंधिताकडे केली होती. मात्र अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले असून, वर्षभरापासून रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहे. त्यामुळे आज वर्षाच्या खेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ रोजी मेनलाईन मधील टांगा चौकात रस्त्यावर केक कापून ‘हॅप्पीबड्डे सेलीब्रेशन’ करण्यात आले. 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने हटके आंदोलन करुन झोपेचे सोंग घेतलेल्या शासन, प्रशासनाचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील रस्त्त्यावरील खड्डे बुजवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. या हटके आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे, सुरज पाटील, तालुकाध्यक्ष मयूर मिसाळ, शहरध्यक्ष सुरज शिंदे, विद्यार्थी आघाडीचे अनिकेत मेश्राम, गजू चेके किशोर ठाकरे, विजय मडावी, चेतन भगत, अभी बोरकर, आकाश घोडे, सतीश राऊत सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments