आंध्र प्रदेशातील अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात चित्र आणि कलाप्रेमीना नुकताच चित्रकलेचा अप्रतिम कलाविष्कार पाहायला मिळाला. जेजे कला महाविद्यालय, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम, अप्रत्यक्ष कर विभाग यांच्या सहकार्याने अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात पलासमुद्रम राष्ट्रीय चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील २५ पेक्षा अधिक ख्यातकीर्त कलाकार या निमित्ताने एकत्र आले होते. या कार्यक्रमाला जे जे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईनचे सर्व प्रतिष्ठित माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत दिमाखदार असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या या चित्रकला शिबिराचा समारोप अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या आवारात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
शशिकांत काकडे, कुलसचिव, सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, मुंबई आणि प्रा. रजनीश कामत, कुलगुरू, सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम तयार करण्यात आला. संस्था श्री.काकडे यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी नामवंत कलाकारांनी त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे योगदान देऊन कॅम्पसमध्ये भारताचा समृद्ध संस्कृती वारसा तसेच आपल्या सर्जनशीलतेचे प्रतिबिंब अधोरेखित केले. सर जेजे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर आणि डिझाईन मधील व्यासंगी कलाकारांनी पलासमुद्रम चित्रकला शिबिराला आपल्या उत्कृष्ट कलाकृतींनी अनोख्या उंचीवर नेऊन ठेवले. यावेळी कलावंतांकडून कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा अवर्णनीय संगम पहायला मिळाला.
यावेळी अंमली पदार्थविरोधी पथकाचे मुख्य महासंचालक गेंगोगदीन पानमेई म्हणाले की, "या चित्रकला शिबिरामुळे कला आणि सर्जनशीलतेचे अनोखे दर्शन झाले असून हे सृजनशीलतेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आमच्या आवारामध्ये अत्यंत प्रतिभावान अशा कलाकारांच्या कलाकृतीची छाप कायमस्वरूपी राहणार असल्याचा आम्हाला अभिमान आहे". तर यावेळी बोलताना सर जेजे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईनचे कलाशिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तरतरे म्हणाले की, " या चित्र शिबिरामध्ये सहभागी कलावंतांनी अतिशय उत्तम कलाकृती सादर करून शिबिराचे उंची वाढवल्याबद्दल आणि सहभागाबद्दल आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो. पलासमुद्रम येथील राष्ट्रीय चित्रकला शिबिर हा केवळ कलात्मक उत्कृष्टतेचा उत्सवच नाही तर नासिन आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट यांच्यातील कायमस्वरूपी भागीदारी दर्शवणारा उत्सव आहे. या चित्र शिबिरात तयार करण्यात आलेल्या कलाकृती या आपल्या आवाराचा अविभाज्य घटक बनतीलच तर जे प्रशिक्षणार्थी आणि चित्रप्रेमींसाठी कायमस्वरूपी समृद्ध करतील. सर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या कला संस्कृती आणि शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाचे प्रतिबिंब या उत्सवात दिसले असून यामुळे या क्षेत्रातील भविष्यातील सहकार्यासाठी तसेच कलात्मक आणि बौद्धिक प्रेरणाचे केंद्र म्हणून पलासमुद्रमची स्थापना करण्याचे आमचे ध्येय असल्याचेही तरतरे म्हणाले.
0 Comments