शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद
८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती
शिर्डी - राज्यातील १०८ मंदिरांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणारे धर्मशिक्षण फलक लावणे, १००हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, मंदिरांमध्ये बालसंस्कारवर्ग चालू करणे यांसह मंदिरे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करत ‘मंदिर तेथे आरती’ करण्याचा निर्धार ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त दुसर्या दिवशी समस्त मंदिर विश्वस्त तथा प्रतिनिधींनी केला. श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे आयोजित तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते.
वक्फ बोर्डच्या माध्यमातून अहिंदूनी मंदिरांच्या आणि हिंदू बांधवांच्या जमिनींवर अतिक्रमण केले आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना त्यांच्या आपल्या मंदिरांना त्यांची भूमी गमवावी लागली आहे. याचा सामना करताना वक्फ कायद्यात केवळ सुधारणा न करता तो पूर्णपणे रद्द करा, अशी मागणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे केली आहे. हिंदूंच्या देवीदेवतांना न मानणार्या अहिंदूंची दुकाने मंदिराच्या आवारात असून प्रसाद, फुले इत्यादींची विक्री ते करतात. इतकेच नव्हे, तर त्याला थुंकी लावून ‘थुक जिहाद’ करतात. यापुढे ज्या वेळी आपल्या गावची जत्रा, उत्सव असेल तेव्हा अन्य धर्मियांची दुकाने तिथे लागणार नाहीत याची काळजी घेऊया. सध्या आखाडा परिषद आणि साधू-संतांनी यंदाच्या ‘प्रयागराज’ येथील कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनाच कुंभमेळा परिसरात व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत स्तुत्य आहे, असे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी म्हटले.
मंदिर परिसरात हिंदू व्यापार्यांनाच ‘ओम प्रमाणपत्र’, तर हिंदू कामगारासाठी ‘हिंदू वर्क फोर्स’ची निर्मिती ! रणजित सावरकर
ज्याप्रकारे आज ‘हलाल’च्या माध्यमातून सर्वत्र धर्मांध जाळे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून यासाठीच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून ‘ओम प्रमाणपत्र’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ओम प्रमाणपत्र’ चालू केले आहे. हे प्रमाणपत्र मंदिरासह प्रत्येक हिंदू व्यापार्यांनी घेणे अत्यावश्यक आहे. यापुढील काळात मंदिरात प्रत्येक ठिकाणी कामासाठी हिंदू कामगार मिळावेत, यासाठी लवकरच आम्ही ‘हिंदू वर्क फोर्स’ची निर्मिती करणार आहोत. यामध्ये हिंदू असतील त्यांनाच नोकरी दिली जाईल, *असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी या वेळी केले. या प्रसंगी ‘अखिल भारतीय संत समिती’ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, ‘ ‘ज्याप्रमाणे हलाल प्रमाणपत्र आहे, त्याचप्रमाणे आता हिंदूंनी ‘ओम’ प्रमाणपत्र घेण्यास आणि तेथूनच वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केला पाहिजे.’’ नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज म्हणाले, ‘‘घटनेने सर्वांना समान अधिकार दिले असून ते कुणाकडून काय खरेदी करावे आणि करू नये हे ठरवू शकतात. त्यामुळे हिंदूंनी नेहमीच कोणतीही वस्तू विशेषकरून प्रसाद हा हिंदूंकडूनच खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला हवा.’’
मंदिर सदस्य नोंदणी आणि मंदिर महासंघाच्या सोशल मिडिया सेलचा प्रारंभ !
या परिषदेत मंदिर महासंघाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला, तसेच मंदिर महासंघाच्या ‘फेसबूक पेज’, ‘इन्स्टाग्राम’, तसेच ‘एक्स’ (ट्विटर) च्या अकाऊंटचा प्रारंभ सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये; तारकेश्वर गडाचे मठाधिपती पू. आदिनाथ शास्त्री; मल्हारा, अचलपूर येथील श्री धरमाळ संस्थानचे महंत देवरावबाबा; संजिवनी गडाचे पू. शंकर महाराज महंत; पुणे येथील ‘ओम जय शंकर आध्यात्मिक प्रतिष्ठान’ मठाचे प.पू. पप्पाजी पुराणिक महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत करण्यात आले. यासाठी एक ‘क्यूआर कोड’ देण्यात आला असून त्याद्वारे थेट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह ‘सनातन पंचांग २०२५’च्या अँड्राईड (Android) आणि आयओएस् (iOS) ॲपचे उद्घाटनही करण्यात आले.या प्रसंगी ‘ग्लोबल महानुभाव संघा’चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पू. सुदर्शन महाराज कपाटे म्हणाले* , ‘‘हिंदूंच्या धार्मिक स्थानांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. सनातन हिंदु धर्माचे प्रत्येक मंदिर आपले आहे, अशी भावना हिंदूंमध्ये निर्माण होईल, तेव्हा हिंदू मंदिरांवरील अतिक्रमणाचा प्रतिकार करू शकतात. अहिंदू दिवसातून ५ वेळा एकत्र येतात, तर हिंदूंनी किमान दिवसातून एकदा तरी एकत्र यायला हवे. मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर-न्यास परिषद कार्य करतच आहे; मात्र या कार्यात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने योगदान द्यायला हवे.’’ याप्रसंगी यवतमाळ येथील भाजप उपाध्यक्ष श्री. रवी ज्ञानचंदानी म्हणाले, ‘‘महाआरती परिवार संघटनाच्या माध्यमातून प्रत्येक मंदिरात प्रत्येक आठवड्याला हनुमान चालिसा पठणाचा सार्वजनिक कार्यक्रम आम्ही चालू केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पूसद येथे प्रतिदिन २५ मंदिरांवर एकाच वेळी सकाळी ६ वाजता हनुमान चालिसाचा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे.’’ या प्रसंगी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक म्हणाल्या, ‘‘काळानुरूप स्वतःला बदलणे आवश्यक आहे. प्रत्येक संस्थेचा प्रसिद्धी प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो प्रसिद्धीमाध्यमांशी सातत्याने संपर्कात राहील.’’
श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता संजीव देशपांडे यांचा सत्कार !
तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यशस्वी आणि नि:शुल्क लढा देणारे छत्रपती संभाजीनगर येथील अधिवक्ता संजीव देशपांडे यांचा महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरूवातीपासून चिकाटीने लढा देणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पूजनीय अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांची वंदनीय उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हा कायदेशीर लढा चालू आहे.
यावेळ अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, श्री भीमाशंकर जोतिर्लिंग देवस्थानचे श्री. मधुकरअण्णा गवांदे, श्रीगोंदा अहिल्यानगर येथील श्रीराम देवस्थानचे ह.भ.प. नाना महाराज शिपलकर, अहिल्यानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रमुख ह.भ.प. प्रभाताई भोंग, भक्तीप्रसाद आश्रमाचे ह.भ.प. संदीप महाराज पिसे, श्री तुळजाभवानीमाता मंदिर सिद्ध गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज, ज्ञानदर्शन गुरुकुल श्रीक्षेत्र हनुमानगडचे अध्यक्ष महंत ह.भ.प. अभिमन्यू महाराज खाडे, शिरापूर येथील श्रीराम मंदिर येथील ह.भ.प. घनश्याम महाराज शिंदे, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे उपस्थित होते.
0 Comments