पांढर सोन चोरणा-या टोळीचा पर्दाफाश

शिरपुर पोलीसांची कारवाई, कापुस चोरीचा गुन्हा २४ तासाचे आत उघड 


यवतमाळ : पांढर सोन (व्हाईट गोल्ड) पिकवणारा जिल्हा म्हणुन यवतमाळ जिल्ह्याची नोंद शासन दरबारी आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कपाशिचे पिक घेतात. कधी कधी साधना अभावी शेती माल शेतात ठेवावा लागतो. अशाच प्रकारे कापुस वेचुन गाठोडे शेतात ठेवले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शेतातून पांढर सोन अर्थात कापुस चोरुन नेल्याची घटना कुरई शेत शिवारात घडली होती. शिरपूर पोलिसांनी तपासचक्र फिरवुन पांढर सोन चोरणा-या टोळीचा पर्दाफाश करुन जेरबंद केले. 

आसीक शेख ईब्राहीम शेख वय ३२ वर्ष ०२) वैभव मारोती मडकाम वय २४ वर्ष ०३) शिवाजी उर्फ मिथुन विठठल मरसकोल्हे वय ३२ वर्ष रा तिन्ही रा. कुरई ता. वणी अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. पोलिस स्टेशन शिरपुर येथे फिर्यादी नामे गिरीधर सिताराम मोहीतकार रा कुरई यांनी दिनांक २८/१२/२०२४ रोजी पोलिस स्टेशन शिरपुर येथे रिपोर्ट दिला की, त्यांचे शेतात दिनांक २६/१२/२०२४ रोजी कापुस वेचणी करून कापुस आणण्यासाठी बैलगाडी न मिळाल्याने ०३ कापसाचे गाठोडे वजन अंदाजे ०२ क्विंटल सायंकाळी ०६/०० वा शेतात ठेवले होते. दुस-या दिवशी दिनांक २७/१२/२०२४ रोजी सकाळी ०७/०० वा शेतात जावुन पाहीले असता शेतात ठेवलेले ०३ कापसाचे गाठोडे वजन अंदाजे ०२ क्विंटल किंमत अंदाजे १५८००/रू चे दिसुन आले नाही. वरून आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आले नाही. कोणीतरी अज्ञात ईसमाने कापसाचे ०३ गाठोडे वजन अंदाजे ०२ क्विंटल किंमत अंदाजे १५८००/रू चे चोरून नेले असा रिपोर्ट दिल्यावरून अपराध क्रमांक ४४९/२०२४ कलम ३०३(२) भा. न्या. संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासात गोपनिय बातमीदार तसेच तांत्रीक विश्लेषण करून संशयीत ईसम नामे ०१) आसीक शेख ईब्राहीम शेख वय ३२ वर्ष ०२) वैभव मारोती मडकाम वय २४ वर्ष ०३) शिवाजी उर्फ मिथुन विठठल मरसकोल्हे वय ३२ वर्ष रा तिन्ही रा. कुरई ता. वणी जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपीं कडुन गुन्हयात चोरी केलेला ०३ गाठोडे कापुस वजन अंदाजे ०२ क्विंटल किंमत १५८००/रू व कापुस वाहतुक करणे करीता वापरलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.३३ जे ११३५ हिरो होंडा स्पेंन्डर प्लस किंमत ६०,०००/रू असा एकुण ७५,८००/रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील सविस्तर तपास सुरू आहे.

सदरची कारवाई  कुमार चिंता पोलिस अधिक्षक  यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधिक्षक सो. यवतमाल,  गणेश किंद्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी,  ज्ञानोबा देवकते पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार पो.स्टे. शिरपुर, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहवा /६४६ गंगाधर घोडाम, पोकों/२६१० विनोद काकडे यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments