माहूरगड पायी वारीला पन्नास वर्षे पूर्ण

जगदंबा देवी नवरात्री दर्शनाला हजारो भाविकांचा सहभाग

यवतमाळ - दुर्गा अष्टमी शाकंभरी देवी नवरात्री समारंभ प्रसंगी दरवर्षी यवतमाळ येथून भाविक मोठ्या संख्येने माहूरगडाची पायी वारी करीत असतात ही पायी वारी जगदंब उपासना मंडळ यवतमाळ द्वारे मागील पन्नास वर्षापासून निरंतर सुरू आहे. ही पायी वारी  बालाजी मंदिर, बालाजी सोसायटी वनवासी मारुती जवळून ४ जानेवर २५ ला निघणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगदंबा उपासना मंडळ यवतमाळ द्वारा मागील ५० वर्षांपासून यवतमाळ ते माहूर गड पायी वारीचे आयोजन करण्यात येते. या वेळेला ४ जानेवारी २०२५ जानेवारीला निघणार असून ७ जानेवारी २०२५ ला शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्य माहूर गडावर भाविकांना उपस्थित राहायचे आहे. या पायी वारीमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन जगदंबा देवीचे दर्शन व या पायी वारीमध्ये सहभाग नोंदविन्याकरीता तसेच अधीक माहितीकरीता प्रमोद पिसाळ, दिपक गंगमवार, संजय बंग, गजेन्द्र उन्हाळे, गजानन भोयर व स्मित पवार यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments