वंचितचे इव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम आंदोलन

 

घाटंजी : भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आणि विश्वासार्हतेबाबत समाजामध्ये संताप निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, घाटंजी येथे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशा नुसार EVM विरोधी स्वाक्षरी मोहिमेचे आंदोलन छेडण्यात आले. या मोहिमेला घाटंजी पोलिस स्टेशन चौक येथे शुभारंभ करण्यात आला. या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले. ही मोहिम १६ डिसेंबर २०२४ पर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावात राबवण्यात येणार आहे.
या प्रसंगी बोलताना संघपाल कांबळे म्हणाले, “EVM विरोधात समाजात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी झालेले मतदान आणि उमेदवारांना मिळालेली मते यामध्ये विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे EVM यंत्रांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. ही स्वाक्षरी मोहीम तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवून अधिकाधिक नागरिकांच्या सह्या जमा करण्यात येतील. हा मुद्दा देशव्यापी स्वरूपात उचलला जाईल.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे घाटंजी तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे, मनोजभाऊ ढगले, अनंत चौधरी, मोरेश्वर वातीले, मनोज राठोड,महासचिव नितीन राठोड, संघटक प्रेमानंद उमरे,अजय खोब्रागडे, घाटंजी शहर कार्यध्यक्ष सतिषभाऊ रामटेके, अनंत भोयर, तुकाराम कोरवते, संतोष जीवने, रा वि नगराळे, सुखदेव रामटेके,पद्मताई खोब्रागडे, जिजाबाई बनसोड, प्रेमीला राऊत, शेषीशिकला नैनपार, उषा शेंडे, श्यामराव मुनेश्वर, निखिल टिपले, अमृत करमणकर, देवतळे, राहुल नगराळे, प्रमोद हस्ते, डोंगरसिंग खोब्रागडे, सुरेश हुमे, संदीप वानखडे, महेंद्र वानखडे, राजू नारायने, बंधन सोडवले, मोहन कांबळे, हरी जिवने, पवन सिसले, गौरव शेंडे, साहिल रामटेके, दीक्षांत वासनिक, गोलू देठे,यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments