शेतातून बैल आले परत, पण युवक परतला नाही

अखेर विहीरीत आढळला युवकाचा मृतदेह


यवतमाळ : जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील  गोंडबुरांडा येथील एक युवक आपल्या शेतात बैल चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी बैल घरी परत आले. मात्र तो घरी परत नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शेतात जावुन शोध घेतला मात्र त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर शेजारच्या शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे काल 26 डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली. 

अमोल भदुजी पारखी वय 42 वर्ष रा.गोंडबुरांडा असे मृतकाचे नाव आहे. अमोल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेतई आहे. अमोल हा काल दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास  शेतात बैल घेवुन गेला होता. सायंकाळी 6-30 वाजच्या सुमारास बैल घरी परत आले. परंतु अमोल हा घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी शेताकडे जावुन शोध घेतला. परंतु त्याचा थांग पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी शेजारच्या शेतातील विहीरीकडे जावुन पाहीले असता अमोल पारखी यांची चपला विहीरीतील पाण्यावर तरंगतांना दिसली. त्यामुळे नातेवाईकांनी गावातील लोकांच्या मदतीने लोखंडी गरच्या साह्याने विहीरीच्या पाण्यात शोध घेतला.  यामध्ये अमोल पारखी हा मृत अवस्थेत आढळून आला. काल दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8-30 वाजताच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या नातेवाईकांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मृतक अमोल यांचे पश्चात आई, वडील, पत्नी , एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जमादार दिगांबर कीनाके करीत आहे.

Post a Comment

0 Comments