संविधानाचा अपमान निषेधार्ह

शांतता राखण्याचे आवाहन : आमदार बाळासाहेब मांगुळकर



यवतमाळ:परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधान ग्रंथाचा अवमान झाल्याची घटना अत्यंत खेदजनक व निषेधार्ह असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. संविधान हा आपल्या देशाचा आत्मा असून, त्याचा अपमान करणाऱ्या समाजविघातक घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार मांगुळकर यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. “चिथावणीखोर घटनांना बळी न पडता एकता व बांधिलकी जपणे हीच या घटनेला योग्य प्रतिक्रिया ठरेल,” असे ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

याशिवाय, बीडमधील सरपंचाच्या अपहरणानंतरझालेल्या हत्येच्या दुर्दैवी घटनेबाबतही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “संबंधित आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी सत्ताधारी पक्षाकडे केली.आमदार मांगुळकर यांनी समाजातील शांतता व एकोप्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments