स्थानिक गुन्हे शाखा व यवतमाळ ग्रामिण पोलिसांची कामगिरी
यवतमाळ : शहरातील शुभम कॉलनी लोहारा बायपास परिसरातील तरुणी पेरप देण्यासाठी गेली मात्र ती घरी परत आली नाही. अखेर दहा दिवसानंतर रविवारी १५ डिसेंबर रोजी तरुणीचा बोरगाव डॅम परिसरात मृतदेह आढळला होता. या तरुणीची हत्या कोणी व का केली हे उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व ग्रामिण पोलिसांनी तपासचक्रे फिरवुन या हत्याकांडाचा छडा लावुन आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या.
प्रमोद नथ्थुजी कोदाने वय ३० वर्ष रा. बनकर ले ऑउट, वाघापुर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी भोला
मनोहर पेटकर वय ५० वर्ष रा. शुभम कॉलनी लोहारा बायपास, यवतमाळ यांनी दिनांक १५/१२/२०२४ रोजी पो.स्टे.ला येऊन फिर्याद होती. त्यांची मुलगी धनश्री हि दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०१/०० वा. सुमारास पेपर देण्यासाठी कॉलेजला गेली होती मात्र
त्यानंतर ती घरी परत आली नाही. त्यामुळे पोलीस
स्टेशन यवतमाळ शहर येथे हरविले बाबत तक्रार दिली. त्यानंतर दिनांक १५ डिसेंबर रोजी मादनी घाट ते बोरगांव
डॅम परिसरात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आहे व तिला अज्ञात ईसमाने
डोक्यात दगड टाकून जिवानिशी ठार मारले अशा फिर्यादी वरुन पोलीस
स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे अपराध क्रमांक ६६०/२०२४ कलम १०३ (१) भान्यासं अन्वये गुन्हा
नोंद करण्यात आला आहे.
या गुन्हा घडल्यापासून पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथकांनी समांतर तपास करित असताना गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथकासह आजूबाजूला व परिसरात माहिती घेत होते. अशातच मुखबीर कडून गोपनिय माहिती मिळाली की, यातील मृतक धनश्री व तीचे घराचे दुर राहणारा प्रमोद नथ्थुजी कोदाने याला आठ महीन्यापुर्वी गाडीची ठोस लागल्याने लोकानी बेदम मारहान केली होती. त्याचा राग त्याचे मनात होता वरुन त्याने तिचेशी जवळीक साधुन मैत्री निर्माण केली. तीला नेहमी कॉलेजला वगैरे जात असतांना बोलचाल करत होता. नमुद व्यक्ती हा घटने दिवशी तिला कॉलेज मध्ये पेपर देण्या करिता सोडून दिले. पेपर किती वाजता संपतो तुला घ्यायला येतो असे म्हणत होता अशी गोपनिय माहीती मिळाली. त्यावरुन निरंतर त्याचा पथका मार्फत शोध घेत असताना वाघापूर नाका येथे खर्रा खाण्या करिता पानठेल्या जवळ येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी धनश्री हिला अंदाजे ५ वाजताच्या सुमारास धामनगांव रोड वरील वाधवाणी कॉलेज येथे घ्यायला गेलो. धनश्री बाहेर आल्यावर तीला म्हटले की, शेतातील मजुराला पैसे द्यायचे आहे आपण जावून येवून वरुन तीने चल मी पण सोबत येते असे म्हटले. त्यानंतर धनश्रीला गाडीवर बसवुन तीला बोरगांव घाटात नेवुन गाडी थांबवीली. माझे सोबत तीने केलेल्या अपघातामुळे मला लोकांनी मारहाण केली होती. त्याचा राग उकरुन काझून वाद केला. तुझ्यामुळे मला लोकानी मारले ; तु सुध्दा नेहमी माझ्याकडे पाहुन हसते व चिढवीते म्हणून धकाबुक्की केली. यावेळी धनश्री खाली पडली असता बाजुला असलेला दगड उचलुन तिचे डोक्यात टाकुन जिवानिशी ठार मारले. त्यानंतर मी काही काळ तेथे थांबून माझे गाडीने घरी निघून आलो. नमुद गुन्हयात कोणताही तांत्रीक व प्रत्यक्ष दर्शी पुरावा नसुन सुध्दा अंत्यत कौशल्यपणाने सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक
पियुष जगताप, स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक
ज्ञानोबा देवकते, सपोनि सुगत
पुंडगे, अमोल मुडे, योगेश गटलेवार, साजिद सैय्यद, बंडू डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, योगेश डगवार, रितुराज मेडवे, सलमान शेख, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सुनिल मेश्राम यांनी केली.
0 Comments