स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ८ मोटर सायकल जप्त : मोटर सायकल चोरीचे ६ गुन्हे उघड
यवतमाळ : मुंबई, ठाणे या मेट्रो सिटीतून रॉयल इनफिल्ड, बुलेट सारख्या महागड्या गाड्या चोरून गाडीचे नंबर बदलून विक्री करणा-या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. चोरट्याकडून ८ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी मोटर सायकल चोरीचे ६ गुन्हे उघड केले असून, ७,१५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी पुसद येथे ही कारवाई केली.प्रमोद दत्ता पवार वयं. ३६ वर्ष, परा पेरंडा ता. पुसद असे आरोपीचे नाव आहे. दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचेकडील पथक पुसद उपविभागामाध्ये पेट्रोलिंग करीत होते. अशातच प्रमोद पवार याने काही दिवसांपुर्वी पुसद बस स्थानक येथून एक स्प्लेंडर प्लस मोटार सायकल चोरून वापरत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन दोन पंचाना सोबत घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येरंडा गाव गाठून प्रमोद पवार याला त्याच्या घरुन ताब्यात घेवुन चौकशी केली. यावेळी आरोपीने १५ दिवसांपुर्वी पुसद बसस्थानक येथून मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचे घराचे आडोशाला जवळच इतर ४ मोटार सायकल आढळून आल्या. त्या बाबत आरोपी प्रमोद पवार याचे भाउजी योगेश वसंत पाचषिले रा. नालासोपारा ठाणे यांनी मुंबई येथून इकडे विकी करण्यासाठी आणल्या असुन या व्यतिरीक्त अजुन ३ मो.सा. या त्यांनी आमच्या गावातील काही तरून मुलांना विक्री केल्याचे सांगितले. प्रमोद पवार हा वापरत आसलेली चोरीची मो. सा. ही पुसद शहर पोलीस स्टेशन अप. क.८९२/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता या गुन्हयातील असल्याचे समोर आले. इतर ४ मोटार सायकल मुंबई, ठाणे या ठिकाणा वरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सर्व मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या. या रॅकेटचा मुख्य आरोपी योगेश वसंत पाचपिले रा. नालासोपारा ठाणे याने येरंडा ता. पुसद या गावातील विक्री केलेल्या ३ मोटार सायकल बावत सदर इसमांना मो. सा. सह चौकशीसाठी बोलावून खात्री केली. योगेश बंसत पाचपिले याने सदर मोटार सायकलचे नंबर बदलून त्यापमाणे डुप्लीकेट आर. सी. बनवुन ओरीजनल कागदपत्र काही दिवसांनी आणुन देतो असे सागितले. सदर मो.सा. कमी किंमनीत सदर तरूनांना विकी केल्या होत्या. त्या तिन्ही मो.सा.च्या चैंसी नंबर व इंजिन नंबरची पडताळणी करीता सदर मोटार सायकल देखील मुंबई, ठाणे परिसरातून चोरी करून त्यांचे नंबर बदलून त्याप्रमाणे डुप्लीकेट आर. सी. तयार करून पुसद परिसरातील नरूनांणा विकी केल्याचे निष्पन्न झाले. त्या ३ महागाठ्या मो.सा.देखील जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे अतिशय कौशल्यपुर्ण रितीने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पथकाने आरोपी नामे प्रमोद दत्ता पवार वय. ३४ वर्ष, रा.येरंडा ता. पुराद जि. यवतमाळ यांस अटक करून सदर रॅकेटचा पर्दाफाश करून एकूण ८ मोटार सायकल किंमत. ७,१५,०००/- रू. मुद्देमाल जप्न केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, सहा. पोलीस अधिक्षक
तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी,
पुसद चिलुमूला रजनिकांत, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा
देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे,
चाउपनि रविंद शिरामे, पोहवा तेजाब
रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडीकार,
पोहवा रमेश जाधव, पोशि सुनिल
पंडागळे यांनी केली.
नागरिकांना आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जुन्या मोटार सायकल खरेदी करतेवेळी ग्राहकांनी सर्व मुळ व पूर्ण कागदपत्राची
खात्री करावी, लालसेपोटी कमी किंमतीत
मोटार सायकल खरेदी करून अमिषांना बळी पडू नये तसेच आपले गावात, परिसरात बिना नंबरच्या,
बनावट कमांकाच्या व कागदपत्र नसलेल्या मो.सा. कोणी वापरत आसल्यास पोलीस
निरीक्षक श्री ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ मो.नं.९३०७३४३४३४ यांना
माहीती दयावी असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments