घाटंजी - पोलीस स्टेशन ते यवतमाळ रोड या मेन मार्गावरील A1 फॅशन सेल चे दुकान जळून खाक झाले त्याची झळ ज्योती बूट हाऊस व तनुश्री मेन्स वेअर ला लागल्याने त्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. सदर घटना ही आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास उघडकीस आली. आगी मध्ये लाखोचा माल जळून खाक झाला असला तरी सकाळची घटना असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. किती रुपयाचे नुकसान झाले ते अद्याप करू शकले नाही. यवतमाळ नगरपरिषद अग्निशमन दल, घाटंजी नगरपरिषद अग्निशमनदल यांची मदत मिळाल्याने आगीवर नियंत्रण करता आले. ए वन फॅशन शेल च्या बाजूला ज्योती बूट हाऊस व एका बाजूला तनुश्री मेन्स वेअर आहे. ज्योती बूट हाऊसलाच लागून अदिती अनघा बँक आहे. सकाळीच आग लागल्याने लक्षात येतात नागरिकांनी, पोलीस विभागांनी, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी, वीज वितरण कर्मचाऱ्यांनी व अग्निशमन दलाने सहकार्य केल्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे बरेचसे नुकसान टळले नाही तर, आगीने रौद्ररूप धारण केले असते तर कॉम्प्लेक्स मधील सर्व दुकान व बँक सुद्धा जळून खाक झाली असते.
The Menu of this blog is loading..........
0 Comments