यवतमाळ : मकरसंक्राती येताच पतंग उडविण्याचा आनंद बच्चे कंपनीसह युवक वर्ग घेतात. मात्र पतंगीचा नॉयलॉन मांजा हा अनेकांच्या जिवावर उठला आहे. शाळेत मुलाला सोडून देत असतांना दुचाकीस्वाराच्या गळ्यात मांजा अटकला. ही बाब लक्षात येताच दुचाकीस्वाराने मांजा फेकला. यामध्ये दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खाली पडून दुचाकीस्वार व त्याचा मुलगा जखमी झाला. ही घटना आज शुक्रवारी वाघापूर नाक्याजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
मनोज जयस्वाल रा. आसेगाव देवी ह.मु. दोनाडकर ले आउट पिंपळगाव, नमन मनोज जयस्वाल १० रा. वर्ष असे जखमीचे नाव आहे. सत्यसाई साई इंग्लीश मिडीयम स्कुल वाघापूर या शाळेत शिकत आहे. आज सकाळी मनोज जयस्वाल हे आपला मुलगा नमन याला शाळेत घेवून जात होते. अशातच वाघापूर नाका परिसरात जस्वाल याच्या गळ्याला मांजा अडकला. ही बाब लक्षात येताच यांनी हाताने मांजा मागे ठकलला. अशातच दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली पडले. यामध्ये मनोज जयस्वाल व त्यांचा मुलगा नमन जयस्वाल हे दोघे जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधित असलेला मांजाची सर्रासपणे विक्री सुरू आहे. गेल्या महिन्याभरात बंदी असलेल्या मांज्यामुळे चार जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. एखादी घटना घडली की, पोलीस थातुरमातुर कारवाई करण्याचा देखावा करतात. मात्र ठोस कारवाई होतांना दिसत नाही. दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांनी मांजावर कायमस्वरुपी बंदी घातल्याने आदेश काढले. त्यानंतरही शहरात खुलेआम मांजाची विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
0 Comments