महेंद देवतळे
घाटंजी (यवतमाळ ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाने विधानसभेच्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आणले व महाराष्ट्रात आपले स्थान मजबूत केले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पार्टीला भक्कम पणे उभे करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिलांना पार्टी सोबत जोडण्यासाठी व महिला वर्गात काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्ह्याच्या महिला निरीक्षक नंदुरबार येथील दीपांजलीताई गावित या यवतमाळ जिल्ह्याच्या निरीक्षक असून त्या दिनांक 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत त्या यवतमाळ जिल्ह्याच्या प्रवासावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महिला जिल्हाध्यक्ष सुनयना संजय येवतकर (अजात) यांच्या माध्यमातून महिला आघाडी भक्कमपणे उभे करण्याचा प्रयत्न होत असून त्याला आणखी वेग देण्यासाठी दीपांजलीताई गावित यांचा यवतमाळ जिल्ह्यात दौरा होत आहे. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये त्या प्रवास करून तालुका ठिकाणी जाऊन महिलांच्या बैठक घेतील व चर्चा करतील. सोबतच महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आहे गटासोबत जोडण्यासाठी व महिलांचा आधार देण्यासाठी व शासनाच्या योजना महिलांपर्यंत मांडण्यासाठी आपल्या प्रवासामध्ये प्रयत्न करणार आहे . त्यांच्या या प्रवासात जिल्ह्याच्या ,तालुका, शहर पदाधिकारी सोबत राहणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनयना संजय येवतकर(अजात) यांनी कळविले आहे.
0 Comments