महाराष्ट्र राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत रिशिता व रितीजा भगत हिने पटकावे सुवर्णपदक



यवतमाळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडा परिषद वाह महाराष्ट्र मार्शल शोतोकान कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक१४ ते १५डिसेंबर २०२४रोजी विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यस्तरीय मराठे स्पर्धे वयोगट ७ वर्ष मध्ये रिशिता रितेश भगत हिने काता व कुमे ते या  कराटे प्रकारात प्रथम स्थान मिळवून स्वर्ण पदक मिळविले. वयोगट १० वर्ष मध्ये रितीजा रितेश भगत हिने काता व कुमेते या  कराटे प्रकारात प्रथम स्थान मिळवून स्वर्ण पदक मिळविले. प्रशिक्षक सेन्साई चंद्रशेखर भिमटे सर, रितेश भगत  यांच्या मार्गदर्शनात यश संपादन केले. यशस्वि खेळाडू यवतमाळ नगरीत आल्यावर सत्कारकार्यक्रमात युरोकिट्स संचालिका दुबे व पालकवर्ग यांनी खेळाडूंचा सत्कार केला.यावेळी खेळाडूयांनी सर्वाचे आभार मानले.  यशाचे श्रेयप्र शिक्षक सेन्साई चंद्रशेखर भिमटे, शाळेचे क्रीडाशिक्षक, आजोबा पांडुरंग भगत, आजी मीरा भगत, मनोरमा बांगडे आई वडील यांना दिले.

Post a Comment

0 Comments