अनियंत्रीत वेगाने घेतला विद्यार्थ्याचा बळी

यवतमाळ : उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंढे महाविद्यात अकरावीत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा अनियंत्रीत वेगाने बळी गेला आहे. महाविद्यालयातून आपल्या दुचाकी वाहनाने घराकडे परत जात असतांना हा अपघात झाला. ही घटना आज सोमवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा जवळ घडली. 


अजित गजानन राठोड रा कृष्णापुर तांडा ता उमरखेड असे मृतकाचे नाव आहे. एम.एच. २९ सि जी ३५१९ क्रमांकाच्या दुचाकीने तो घराकडे जात असतांना पाठीमागु आलेल्या एम.एच. ४८ टि ५५८० क्रमांकाच्या टिप्परने धडक दिली. या घटनेत अजित राठोड याचा मृत्यू झाला. मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन उमरखेड पोलिसांनी टिप्पर चालका विरुध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.  


Post a Comment

0 Comments