परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ वडार समाज रस्त्यावर

वडार समाज बांधवांचा भावनिक उद्रेक 

घाटंजी : परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकाची विटंबना केली गेली त्या घटनेत निष्पाप संविधान रक्षक आमच्या वडार समाजाच्या तरुणाचा मृत्यु झाला. त्यामुळे घाटंजी मध्ये वडार समाज बांधवांचा भावनिक उद्रेक बाहेर पडला. मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष रवी भोजवार, शहर प्रमुख नितेश भांडेकर, उपाध्यक्ष भास्कर धोत्रे, सचिव आकाश भोजवार यांच्या नेतृत्वात हा मोचा काढला. या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांचे मार्गदर्शन केले मोर्चा वडार वाडी, घाटंजी येथून शहराच्या मुख्य रस्त्याने जात तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार याचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. 

आपल्या संपूर्ण देशाने भारतीय संविधानाचा सन्मान राखला पाहिजे. परंतु असे चित्र दिसत नाही. अशाच स्थितीत परभणीत घडलेल्या उद्रेकाच्या घटनेशी काहीही संबंध नसलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे निर्घृण खून झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी व तेवढीच अस्वस्थ करणारी आहे. कारण ही व्यवस्था सर्व कायदेकानून धाब्यावर बसवून काम करत आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात ही व्यवस्था कोणतीही पावले उचलत नाही, मात्र संविधानाच्या संरक्षणासाठी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात निर्घृण कृत्य करण्यासही मागेपुढे पाहत नाही हीच खरी शोकांतिका आहे. या मोर्चात सतीश रामटेके, देविदास जगताप, निलेश जगताप, रा. वि. नगराळे केले यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चाला संघटनेचे सर्व पदाधिकारी आकाश भोजवार, दिलीप जगताप, देविदास जगताप, निलेश जगताप अविनाश जगताप, श्रावण जगताप, विशाल मंजुळकर, संजय गुंजकार, उमेश देवकर, सुनील जगताप, विष्णू हुलगुंडे, विजय भोजवार, भास्कर धोत्रे, विनोद देवकर (आर्णी), सुनील धोत्रे, हणमंतू धोत्रे, सुनील कुटेकर, रमेश शिंदे, संतोष भोजवार, अभिषेक एम्बडवार, विकास एम्बडवार, मारोती कवडूकर, निर्मला भोजवार, उमा रवी भोजवार, सीता लक्ष्म भोजवार, राजू केशव भोजवार, कविता, सुनील धोत्रेराजू भोजवार, संतोष मिटकर, गावातील नागरिक व आंबेडकरी समाज उपस्थित होते. 

प्रमुख  मागण्या :  १) दिनांक १०/१२/२०२४ ला परभणी मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या शिल्पाचे तोडमोड करून विडंबना करणाऱ्या वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी. २) परभणी हिंसाचार घटनेतील दोशिंनकडून परभणी घटनेतील नुकसान भरपाई देण्यात यावी. ३) संविधान रक्षक मा. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी देऊन पन्नास लाखाची मदत देण्यात यावी. ४) संविधान रक्षक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या निधनास पूर्णपाने जबाबदार असणार्या मुंडा पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक ,पोलीस उपनिरीक्षक परभणी, एल.सि.बि.चे पोलीस निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्य वधाच गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबन करा. ५) परभणी ला झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या शिल्पाचे तोडमोड करून विडंबना करण्यात आली या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी S.I.T. नेमण्यात यावी.

Post a Comment

0 Comments