कारची वीज खांबाला धडक ; सहा जण जखमी

 


पुसद माहूर रोडवर अपघात 


 यवतमाळ : माहूर कडून पुसद कडे  सुसाट वेगाने जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघात सहा जण जखमी झालेत. जखमींना तातडीने पुसद येथे उपचारास पाठविण्यात आले . सकाळी सकाळी चालक सुसाट वेगाने वाहन चालवत असताना अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने एका इलेक्ट्रिक  सिमेंट पोलला जोराची धडक देऊन इलेक्ट्रिक पोल हा दहा ते वीस फूट घासत नेल्याने गाडीचा चेदामेंदा झाला. यात कुठल्याही प्रकारे जीवित हानी झाली नाही , तरी पण एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. असे ही कळाले सदर गाडी ही जळगाव जिल्ह्यातील आहे .अपघात झालेल्या गाडी क्रमांक एम एच 39 जी 7406  गाडी बेवारस सोडून गेल्याने अजून कोणीही गाडीपाशी कोणीही  आले नाही.

Post a Comment

0 Comments