सुंगधीत तबांखुसह ७ लाखाचा मुद्देमाल जप्त: दोन आरोपींना अटक

 


बिटरगांव पोलीस स्टेशनची कार्यवाही

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य शासनाने २० जुलै २०२४ पासून व्यापक जनहितार्थ महाराष्ट्र राज्यात गुटखा सुमधीत तबाखु पदार्थाचे उत्पादन साठा, वितरण, वहातुक व विकास निर्बंध घातले आहे. प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखाची अवैध वाहतूक करणारे वाहन सोईट ते ढाणकी रोडवर पकडले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्याच्याकडून सुगंधीत तंबाखु, ऑटो असा एकुण ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

चालक तौफिक खान फकीर खान, वय ३५ वर्ष, रा. जामा मस्जिद वार्ड उमरखेड, इम्तियाज खान अजय खान वय अ ३० वर्षे. रा वसंत नगर, पुसद अशी आरोपींची नावे आहे. दि. १३ डिसेंबर रोजी रात्री दरम्यान ऑटो क्रमांक एम एच ०३ ए एच ७६३६ मधुन सुगंधीत तबाखुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून सोईट ते ढाणकी रोडवर ऑटो अडवुन पाहणी केली. सुगंधित तबाखूचे १८ बॉक्समध्ये ९०० पॅकेट किमंत अदांजे ५४०००० (पाच लाख चाळीस हजार) व अवैध वहातुक करण्यासाठी वापण्यात आलेला ऑटो किंमत अंदाजे १,६०,०००/- असा एकूण ७,००,०००/रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द  २०२४ कलम २७३, २७४, २७५, १२३, ३(५) BNS सहकलम ५९ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ नियम व नियमने २०११चे कलम २६(२) कलम २७, कलम ३०(२) (अ) कलम नुसार कार्यवाही करण्याची प्रक्रीया सुरू आहे. पुढील तपास पो.उप.नि. शिवाजी टिपुर्णे हे करीत आहे.

सदरची कार्यवाही कुमार चिता पोलीस अधीक्षक, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक, रजनिकात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर, पुरवठा निरीक्षक अमितकुमार उपलप अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व प्रशासण, पोहेको रवि गिते, पोना देविदास हाके, पोकों निलेश भालेराव, बालाजी मस्के यवतमाळ पो उप नि शिवाजी व प्रविण जाधव यांनी केली.

Post a Comment

0 Comments