फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा बनाव उघड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ : वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या भारत
फायनान्स कंपनीत कार्यरत असणारा निलेश नागेश पुरी वय वर्ष 19 रा. अनंतवाडी
ता.
महागाव यांनी बॅग आणि रोख रक्कम अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची तक्रार
दाखल केली होती. सदर प्रकरणाची चौकशी महागाव
पोलिसांकडून यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडे सोपविण्यात आली. त्यानंतर
संपूर्ण तपासांती निलेश पुरी यानेच बनाव रचून रक्कम आणि इतर साहित्य आपल्या
परिचित व्यक्तीकडे ठेवल्याचे उघड झाले. यावरून पोलिसांनी
संपूर्ण साहित्य जप्त करून निलेश पुरी याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी महागाव पोलिसांच्या ताब्यात
दिले. अतिशय गुंतागुंतीचा असलेल्या प्रकरणाचा स्थानिक
गुन्हे शाखेने तपास करुन उलगडा केला.
24 डिसेंबर
रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान भोजला टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर वालतुर रोडकडे जाणाऱ्या
रोडवर त्यांनी त्यांची नवीन मोटरसायकल एचपी डीलक्स याने जात असतांना वालतुर थांब्यावरच
दोन अज्ञात इसमांनी विना क्रमांकाच्या मोटरसायकलने लाथ मारून निलेश पुरी यांना खाली
पाडले. त्यांची मोटरसायकल,
बॅग, त्यामध्ये
असलेले भारत फायनान्स कंपनीची रोख रक्कम 66 हजार रुपये, सॅमसंग कंपनीचा
टॅब किंमत अठरा हजार रुपये, बायोमेट्रिक मशीन किंमत 5400 असा एकूण 89,400 चा मुद्देमाल
जबरीने चोरी करून आरोपी भोजला बाजूकडे पळून गेले असे तक्रार दिली होती. महागाव पोलिसांनी
तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू केला होता. मात्र या प्रकरणाचे घागेदोरे गवसले
नाही. अखेर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात अला.
0 Comments