विद्यापीठात आविष्कार 2024 संशोधन महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
अमरावती - विज्ञानाने खूप प्रगती केली. दिवसेंदिवस नवनवीन संशोधन होत असून त्या संशोधनाचा समाजाला अधिकाधिक कसा फायदा होईल, हा दृष्टीकोन समोर ठेवून उदयोन्मुख संशोधकांनी संशोधन केले पाहिजे. निसर्गात रोज अनेक घटना घडतात, त्याचे सूक्ष्म निरीक्षण करुन तद्वतच त्यावर संशोधन करुन नवनवीन संशोधनातून मानवी जीवन सुकर होवू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.पी. काणे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आविष्कार सेलच्यावतीने संशोधन महोत्सव आविष्कार 2024 चे आयोजन पाचही जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांसाठी करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, न.न.सा.चे संचालक डॉ. अजय लाड, आविष्कार कक्षाच्या समन्वयक डॉ. वैशाली धनविजय, आयोजक सचिव डॉ. गजानन मुळे उपस्थित होते.
फित कापून आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. पुढे बोलतांना डॉ. काणे म्हणाले, सहभागी सर्व विद्यार्थी उत्कृष्टरितीने आपल्या संशोधनाचे सादरीकरण करतील आणि यामधून उत्कृष्ट संशोधनाचे राज्यस्तरीय सादरीकरण होईल. विज्ञान व तंत्रज्ञान हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाचा घटक आहे आणि दररोज त्याचा संबंध येतो. मानवी जीवन सुकर होईल अशा विविध बाबींवर विद्याथ्र्यांनी निरीक्षण करुन संशोधन केले पाहिजे. त्यांच्या संशोधनामुळे समाजाचा विकास होण्यास निश्चितच हातभार लागेल. सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्याला शरीर, मन व बुद्धी दिली आहे. मानवी जीवन सुखी करण्यासाठी विज्ञानाच्या आधारावर संशोधन करीत असतांना अध्यात्माचा आधार सुद्धा महत्वाचा आहे. विज्ञान व अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत. विद्याथ्र्यांनी निसर्गातील अनेक बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करुन त्यावर समाजाच्या भल्यासाठी संशोधन करावे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
आविष्कार उदयोन्मुख संशोधकांसाठी उत्तम संधी - कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू म्हणाले, आविष्कार म्हणजे नवीन काही तरी शोधून काढणे. वैज्ञानिक दृष्टीने एखाद्या संशोधनातून जे आऊटपूट निघते, त्याला आविष्कार म्हटल्या जाते. विद्याथ्र्यांमध्ये संशोधनासाठी क्रिएटीव्हिटी व ओपन मार्इंड असणे गरजेचे आहे. तद्वतच सूक्ष्म निरीक्षण त्याने करायला हवे. शास्त्रज्ञ न्यूटनने झाडावरुन फळ खाली पडल्यानंतर त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले व संशोधनातून गुरूत्वाकर्षणाचा शोध लावला. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विविध अंगाने अनेक शोध लागत आहेत. आपल्या हातातील मोबाईलद्वारे आपण जगातील कुठल्याही भागात व्हिडीओच्या माध्यमातून बोलू शकतो. भविष्यात नवनवीन संशोधन सातत्याने येत राहतील, त्यामुळे विद्याथ्र्यांनी उदयोन्मुख संशोधक होवून समाजाच्या विकासाकरीता गरजेनुरुप नवनवीन संशोधन करण्यासाठी सातत्यपूर्ण पुढाकार घेतला पाहिजे. राज्यपाल महोदयांच्या कल्पनेतून सुरु झालेली आविष्कार स्पर्धा ही निश्चितच विद्याथ्र्यांकरीता मोलाची संधी आहे.
संशोधन करीत असतांना गुणवत्ता व दर्जावर भर देणे आवश्यक आहे. दर्जेदार संशोधन देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. कुठलेही संशोधन करतांना ते गुणवत्तापूर्ण करा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता होता कामा नये, असे आवाहन कुलगुरूंनी याप्रसंगी केले. याप्रसंगी विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या संशोधनाच्या प्रतिकृतींचे मान्यवरांनी निरीक्षण करुन विद्याथ्र्यांशी संवाद राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाचे सुरुवात झाली. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. प्रास्ताविक समन्वयक डॉ. वैशाली धनविजय यांनी केले, त्यामध्ये 225 प्रवेशिका आविष्कार स्पर्धेत प्राप्त झाल्या असून त्यातून दर्जेदार संशोधन निवडल्या जाईल व ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविल्या जाणार असल्याचे सांगून आयोजनामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. संचालन प्रा. ·ोता खेतान व प्रा. अभिजित इंगळे यांनी, तर आभार डॉ. गजानन मुळे यांनी मानले. कार्यक्रमाला पाचही जिल्ह्रांतील सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, परीक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments