महागाव तालुक्यातील नेहरुनगर मुडाणा येथील घटना
यवतमाळ : महागाव
तालुक्यातील नेहरूनगर (मुडाणा) येथील शिवाजीराव मोघे वि.जा.भ.ज. प्राथमिक
आश्रम शाळेतील १४ विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यामधून विषबाधा झाली.
काल बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी आश्रम शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली. खबरदारीचा
उपाय म्हणून बाधित असलेल्या १४ विद्यार्थ्यांना त्यामध्ये जीवन गणेश जाधव, महेश अनिल जाधव ,अरविंद अंकुश जाधव ,शिवशंकर
कैलास राजने, कार्तिक प्रवीण राठोड समाधान दत्ता जाधव आदेश अंकुश
जाधव, रुद्र रामेश्वर जाधव ,किरण
सिताराम जंगले ओंकार गजानन सुलभेवार, रोहन मधुकर जाधव, मंगेश मनोहर राठोड, समाधान रवी राठोड, रितेश
अवधूत राजने ९ ते 14 वयोगटातील विद्यार्थी उपचारासाठी महागाव ग्रामीण
रुग्णालयात सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. बाधित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातच रात्रभर अॅडमिट ठेवून उपचार करण्यात
आले. आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांना
रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
पिण्याच्या पाण्यातून औषध घेतल्याने झाली विषबाधा
शिवाजीराव मोघे प्राथमिक
आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी आदेश अंकुश जाधव याने बिसलेरी बॉटलमध्ये ओ.आर.एस. पावडर, इनो पावडर आणि अजून एक औषधी टाकून पाणी पिले. याच
बिसलेरी बॉटल मधील पाणी अन्य १३ सहकारी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिले. सर्व १४ विद्यार्थ्यांना नंतर मळमळ उलटी व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी चांगलेच
घाबरले. फूड पॉयझनिंग ची लक्षणे जाणवू लागलेल्या विद्याथ्यर्थ्यांना
उपचारासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय
अधिकारी डॉ. उदय करोडकर यांनी बाधित विद्यार्थ्यांवर उपचार
केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज सकाळी विद्यार्थ्यांना
डिस्चार्ज देण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी नाममात्र सुविधा
नेहरूनगर येथील शिवाजीराव
मोघे आश्रम शाळेत १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी
शाळेत नाममात्र सुविधा उपलब्ध आहेत. स्वयंपाक गृहातच अग्निशामक
उपकरणे ठेवण्यात आली आहेत. या शिवाय मोठ्या प्रमाणात अस्वच्छता येथे आढळून
आली. आश्रम शाळेत आमणी, चिल्ली, नांदगव्हाण, बिजोरा, सेनंद, धरमवाडी व अन्य गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाज
कल्याण विभागातील अधिकारी इकडे फिरकतही नाहीत त्यामुळे या आश्रम शाळेतील मनमानी कारभार
हाताबाहेर गेला आहे.
0 Comments