महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदावर संध्या सव्वालाखे कायम
मुंबई: भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलकाजी लांबा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सर्व राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या पदावर कायम राहून नवीन समित्या निवळ प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसची सदस्यत्व मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत.
१) दिपाली लालाजी मिसाल - संभाजीनगर २) आयशा असलम खान - ठाणे ३) डॉ. अंजलि पी. ठाकरे -अमरावती ४) सुनीता गवांडे- रामटेक ५) सीमा विनोद सहारे - गधचिरोली चिमूर ६) स्वाति राजेश जाधव - नासिक ७) श्रीमती साक्षी एस. वंजारी - रत्रागिरी-सिंधुदुर्ग ८) सीमा महेश आहूजा - कल्याण ९) सुषमा शरदचंद्र राजेघोरपडे - सातारा.
0 Comments