अखरे महायुती सरकारचे खातेवाटप

कॅबिनेटमंत्री संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण तर प्रा. अशोक उईक यांच्याकडे आदिवासी विकास खाते
राज्मंत्री इंद्रनिल नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास व पर्यटन खाते

यवतमाळ : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त उमेदवार विजयी झाल्याने भाजप हा मोठा भाउ ठरला. महायुतीचे घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना घेवून भाजपाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंघ्येला मंत्रिमंडळाचा वस्तार करुन आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. अधिवेशनात मंत्री हे बिन खात्याचे होते हे विशेष. अखेर आज अधिवेशनाचे सुप वाजल्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले.


यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते दिग्रस मतदार संघाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परिक्षण खाते देण्यात आले. तर राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा कॅबिनेटमंत्री प्रा. अशोक उईके यांना आदिवासी विकास खाते देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्यमंत्री इंद्निल नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास व पर्यटन या खात्याची जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यात महायुतीचे एकुण पाच आमदार असून, भाजपाचे तीन, शिवसेनेचा एक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा एका आमदाराचा समावेश आहे. त्यापैकी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाचे आ. प्रा. अशोक उईके, शिवसेनेचे आ.  संजय राठोड व राष्ट्रवादीचे इंद्रनिल नाईक यांना स्थान मिळाले.

कॅबिनेट मंत्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागउपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रशेखर बावनकुळे महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील  जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास). हसन मुश्रीफवैद्यकीय शिक्षण.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री, गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन .गुलाबराव पाटीलपाणीपुरवठा, गणेश नाईक- वन, .दादाजी भुसे शालेय शिक्षण, संजय राठोड - माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल, पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन, अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर, अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान , दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, चालुघडामोडी 2024, अदिती तटकरे - महिला व बालविकास, शिवेंद्रराजे भोसलेसार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटेकृषी, जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज, नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारेकापड, संजय शिरसाट - सामाजिक न्याय, प्रताप सरनाईकवाहतूक, भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन, नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकरकामगार, बाबासाहेब पाटीलसहकार, प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आदि खाते देण्यात आली.

राज्यमंत्री : माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठाइंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम  - गृहराज्य शहर, पंकज भोयरगृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली.

 

Post a Comment

0 Comments