डंपरने फुटपाथवरील लोकांना चिरडले : तीन जण ठार; सहा जण जखमी

मृतक अमरावती जिल्ह्यातील; रोजगाराच्या शोधात गेले होते पुण्याला


पुणे / अमरावती : 

अमरावती जिल्ह्यातील काही मजुर रोजगाराच्या शोधात पुणे येथे गेले होते. तेथे कोणाचा ठाव ठिकाणा नसल्याने काल रात्री फूटपाथवर झोपले होते. अशातच लोकांना डंपरने चिरडले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन निष्पाप मुलांचाही समावेश आहे. ही घटना पुण्यातील वाघोली शहराती केसनंद फाटा परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडली. 


विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष , वैभव रितेश पवार वय 2 वर्ष अशी मृतकांची नावे आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते.  बाकीचे फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. यादरम्यान भरधाव डंपर थेट फूटपाथवर चढला आणि झोपलेल्या लोकांना चिरडत पुढे गेला. आरडा ओरडा ऐकून लोक धावत आले आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतले. या अपघातात 22 वर्षांचा विनोद पवार यांचा मुलगा विशाल, रितेश पवार यांची एक वर्षाची मुलगी वैभवी आणि रितेश पवार यांचा 2 वर्षाचा मुलगा वैभव हे अपघातात मृत्युमुखी पडले. तर  जानकी दिनेश पवार (21),  रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9),  नागेश निवृत्ती पवार (२७),  दर्शन संजय वैराळ (१८), अलिशा विनोद पवार (४७) हे जखमी झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. जखमींची प्रकृती अजूनही धोक्याबाहेर आहे. आरोपी ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments