ना. संजय राठोड यांची लाडू तुला

प्रवीण निमोदिया यांच्या पुढाकाराने आयोजन; यवतमाळात प्रथम आगमन


यवतमाळ : ज्येष्ठ शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, ना. संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात निवड झाली. त्यामुळे संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंधारण आणि मृदसंधारण या महत्वाच्या खात्याचे मंत्री झाल्यानंतर दिनांक २५ डिसेंबर रोजी त्यांचे यवतमाळ शहरात प्रथम आगमन झाले.  या प्रसंगी वनवासी मारुती मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन परिसरापर्यंत भव्य मिरवणूक करण्यात आली. या सोहळ्यात आकर्षक आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर, आणि शोभायात्रेने संपूर्ण शहर उत्साहाने नटले होते. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमोदिया यांच्या पुढाकाराने लाडू तुला करण्यात आली. यानंतर भगवा शेला, पुष्पगुच्छ, हार आणि श्रीफळ देऊन प्रवीण निमोदिया यांनी ना. संजय राठोड यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला चेंबर ऑफ कॉमर्स, टिंबर मर्चंट असोसिएशन, व्यापारी आघाडी, नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ, महावीर इंटरनॅशनल, श्याम बाबा भक्त मंडळ, कमला देवी फाउंडेशन, एमआयडीसी असोसिएशन, जिल्हा डेंटल प्रॅक्टिशनर असोसिएशन, तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments