महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद
पुसद : महायुतीचे आ. श्री. इंद्रनील नाईक यांनी राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे पुसद मधील नाईक चौकात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटून आनंद साजरा केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस , एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी युवा आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
मागील 72 वर्षापासून नाईक परिवाराचे अविरत जनसेवा आणि या निवडणुकीत आ इंद्रनील नाईक यांना मिळालेले प्रचंड मताधिक्य यामुळे इंद्रनील नाईक यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मतदारसंघातील महायुतीचा प्रत्येक सहकारी उत्साहित असल्याचे मत इंद्रनील नाईक मित्र परिवाराचे प्रा. नरेंद्र जाधव यांनी यावेळेस मांडले. ह्या प्रसंगी श्री अमोल मस्के, श्री अक्षय राठोड, श्री गजानन टारफे, श्री देवानंद जांबुतकर यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments