'नंददीप' मध्ये तीन मनोरुग्णाची एन्ट्री

 माजी सीओं माधुरी मडावी यांचा पुढाकार ;सेवाकार्याला व्यापक स्वरूप मिळाल्याचे समाधान

यवतमाळ : नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते बेघर अशा तीन मनोरुग्णांना नंददीप येथे आज आश्रय देण्यात आला. त्यांच्याच पुढाकाराने फाऊंडेशनला तीन वर्षांपूर्वी समर्थवाडीतील बंद पडलेली ही शाळा मिळाली होती. मनोरुग्णसेवेला  व्यापक स्वरूप मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

संदीप आणि नंदिनी शिंदे यांच्या मनोरुग्णसेवेला हक्काचा निवारा देण्याचे योगदान मडावी यांना जाते. त्यांनी आपल्या सेवाकाळात समर्थवाडीतील न.प शाळा क्रमांक १९ मनोरुग्णांना दिली. १७ डिसेंबरला त्यांनी राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हा निरीक्षक दीपांजली गावीत यांच्यासमवेत केंद्राला भेट दिली. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणाहून सुरु झालेल्या मनोरुग्ण सेवेला व्यापक स्वरूप मिळत आहे. या मानवीय कार्याचा मी भाग होऊ शकले,याचे अतीव समाधान असल्याचे मडावी म्हणाल्या.त्यांच्या हस्ते आज सुरज नामदेव मेठेकर,अल्लू (केंद्राने ठेवलेले नाव) तसेच कविता किसन नागमोते यांना प्रवेश देण्यात आला. मडावी ह्या पूर्वीपासूनच नंददीपच्या मनोरुग्ण सेवेशी जुळून आहेत. एक जबाबदार अधिकारी कसा असावा, हे त्यांनी आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिले. अल्पावधीतच त्या प्रसिध्दीझोतास आल्या होत्या. त्यांची बदली रोखण्यासाठी पहिल्यांदाच यवतमाळकर जनता रस्त्यावर उतरली होती.संदीप व नंदिनी शिंदे यांच्या मनोरुग्णसेवेत मी हयातीत असेपर्यंत सोबत असल्याचे अभिवाचन त्यांनी याप्रसंगी दिले. त्यानंतर त्यांनी बोथबोडण फाट्यावरील प्रस्तावित जागेची पाहणी केली. जमिनीचे दान देणाऱ्या हरिओम  (बाबूजी) भूत यांच्या उदार वृत्तीची त्यांनी तोंडभरून प्रशंसा केली. यावेळी  नंददीपचे मार्गदर्शक नरेंद्र पवार,स्वयंसेवक निशांत सायरे,समुपदेशक अमित कांबळे,परिचारिका किशोरी मेश्राम,नेहा डेबूर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments