संजय राठोड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ


दारव्हा (यवतमाळ) : नागपूर येथील राजभवनात रविवारी दि.१५ डिसेंबर ला महायुती सरकारचे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ शपथग्रहण सोहळ्यात दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड  यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर दारव्हा शहरात कार्यकर्त्यांनी  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसमोर फटाके फोडून, घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. संजय राठोड यांनी २००४ ते २०२४ सलग  पाचव्यांदा विजय संपादन करीत महसुल राज्यमंत्री, वनमंत्री,अन्न व औषध प्रशासन मंत्री,मृद व जलसंधारण मंत्रीपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. मतदार संघातील सातत्यपूर्ण जनसंपर्क तथा मतदार संघासाठी निधी खेचून आणुन मतदार संघाचा केलेल्या विकासामुळे ते वाढत्या बहुमताने विजयी होत आले व लोकप्रिय आमदार ठरले.त्यांना मंत्रीपद मिळावे ही जनसामान्यांची ईच्छा आज पुन्हा पुर्ण झाली.शहरात दुपारनंतर सर्वत्र हर्षोल्हासात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments