महागाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वागद इजारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला विद्यार्थ्यांची पटसंख्या 45 असून या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी 15 विद्यार्थी पटसंख्या असताना दोन दोन शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेलेली आहे. जिथे गरज असताना शिक्षक नाही. या मागणीसाठी वागद इजारा येथील एक ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह तालुका गाठून गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर या चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देत मोर्चा काढून शिक्षकाची मागणी केली. साहेब शिक्षक द्या.... ही आर्त हाक व आक्रोश घेऊन या असवेदनशील शासन धोरणाच्या विरोधात चिमुकल्यांनी एल्गार पुकारला. या विद्यार्थ्यांची आर्त हाक ऐकून महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दोनच दिवसात शाळेला शिक्षक देण्याचे आश्वासन यांनी दिले. यावेळी या गावातील विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक संदीप काळे , कांता तडसे , उमेश भाऊ राठोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व या शाळेचे मुख्याध्यापक पवार, मनीष जाधव उपस्थित होते.
ग्रामीण विभागातील जिल्हा परिषद शासकीय शाळेचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शैक्षणिक विधेयकात सुधारणा आणून या शासकीय शाळा लोकाभिमुख करून गुणात्मक दर्जेचे शिक्षण येथे मिळाव यासाठी शासनाच्या धोरणात अभिप्रेत व अपेक्षित असलेले बदल धोरणात व्हावे सध्याच्या काही अपवादात्मक शाळा या कोंडवाड्या सारख्या झाल्या असून ही दुरावस्था समाज मनाला अस्वस्थ करणारी आहे.
शेतकरी नेते मनीष जाधव
0 Comments