डॉक्टरचा हलगर्जीपणा व चुकीच्या उपचारामुळे इसमाचा पाय निकामी

शासकीय रुग्णालयातील प्रकार : न्यायासाठी रुग्णाचे उपोषण

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उमरसरा भागातील इसमाच्या पायाच्या ऑपरेशन करण्यात आले. पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे इसमाचा पाय निमाकी झाला आहे. त्यामुळे अधिष्ठातासह सबंधित डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शासकीय रुग्णालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

मंगेश भगत रा. उरसरा या इसमाचे १२ जानेवारी येथील वसंतराव नाईक रुग्णालयात उजव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. जन आरोग्य योजने अंतर्गत हे ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये ११ महिने होवूनही पाय दुरुस्त झाला नाही. या बाबत वरिष्ठ अधिका-यांना माहिती मागीतली असता अधिष्ठाता गिरीष जतकर यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन न्याय द्यावा, अधिष्ठाता जतकर व सबंधित डॉक्टरवर कारवाई करावी या मागणीसाठी १६ डिसेंबर पासून रुग्णालयाच्या समोर उपोषण सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही इशाराही त्यांनी दिला आहे. मंगेश भगत यांच्या उपोषणाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष (यवतमाळ पुर्व) आकाश वाणी यांनी पाठींबा दिला आहे.

शासकीय योजनेतून ऑपरेशन झाले नाही 

मंगेश उत्तमराव भगत ह्या रुग्णाचे शल्यचिकित्सा शास्त्र विभागात ऑपरेशन कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत झालेले नाही. पण रुग्ण बिपिएल असल्यामुळे रुग्णालया तर्फे नि:शुल्क उपचार करण्यात आल्याची माहिती शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विजय पोटे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments